Add

Add

0
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी जाहीर

पुणे :-‘राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न राहावे. कलाकारांवर दडपण न येता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक कलागुणांना पोषक वातावरण मिळाले पाहिजे, यासाठी कार्यरत राहावे’, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा बारामती हॉस्टेल येथे झाला.
 या मेळाव्यात पुणे शहर सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्र वादी काँग्रेस पुणे शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या.‘मोदी सरकारच्या जीएसटी निर्ण यामुळे व नोटबंदी मुळे कला क्षेत्राला खुप फटका बसला’ अशी टीकाही अजित पवार यांनी केली’
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या शहराध्य क्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बाबा साहेब पाटील हे यापूर्वी वृक्ष प्राधीकरण समितीवर कार्यरत होते निर्माते माणिक बजाज,दरबार बँडचे प्रमुख इक्बाल दरबार यांची शहर संघटकपदी तर निर्माते नीलेश नवलाखा, अभिनेत्री पूजा पवार, नितीन मोरे, शेखर गरूड, माया धर्माधिकारी यांची शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
                           विधानसभा अध्यक्ष निहाय नियुक्त्या पुढीलप्रमाणे ः-
माधवी मोरे (खडकवासला मतदार संघ), जुई भगत (कसबा विधानसभा मतदार संघ), शाल्मीरा पुंंड (शिवा जीनगर विधानसभा मतदार संघ), शैलेश जाधव (कोथरूड विधानसभा मतदार संघ), दिलीप मोरे (हडपसर मतदार संघ), रोहिणी तारे (पर्वती मतदार संघ), भास्कर नागमोडे, योगेश सुपेकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.
पुण्यात पालिकेच्या सहकार्याने ‘कलाकार भवन’ उभारणे, पालिकेची सांस्कृतिक समिती करण्यासाठी आग्रह धरणे, कलाकारांना विशेष वैद्यकीय सुविधा, राज्य सरकारकडून उपचारासाठी अनुदान कार्ड मिळावे अशा मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

 
Top