Add

Add

0
'
नवचैतन्य हास्ययोग परिवार
​'​
द्वी दशकपूर्तीनिमित्त 
​आयो
​जन 

पुणे(प्रतिनिधी):-​​अनेक गाजलेल्या सुरेल हिंदी गीतांची बरसात, सर्व ज्येष्ठ हास्ययोग कार्यकर्त्यांनी केलेले उत्स्फूर्त नृत्य यामुळे 
'आज फिर जीने कि तमन्ना है'
​हा गीतांचा कार्यक्रम गाजला !
निमित्त होते
​​
'नवचैतन्य हास्ययोग परिवार'च्या
​​
द्वीदशकपूर्ती
​ कार्यक्रमाचे.​
​याद्वीदशकपूर्ती 
निमित्त 
​मंगळवारी 
मनीषा लताड,'गंधार एन्टरटेनमेंट्स'आणि'महक'प्रस्तुत
'आज फिर जीने कि तमन्ना है'
​ हा कार्यक्रम 
गणेश कला क्रिडा मंच येथे 
​आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाचा हास्ययोग
​ कार्यकर्त्यांनी 
​आनंद लुटला.'नवचैतन्य हास्ययोग परिवार'
​च्या उपाध्यक्ष सुमन काटे यांनी मनीषा लताड यांचा सत्कार केला. यावेळी 
'नवचैतन्य हास्ययोग परिवार'
​ चे अध्यक्ष विठ्ठल काटे आणि मान्यवर उपस्थित होते. ​
मनीषा लताड
​, ​
गफार मोमीन, विवेक पांडे
​ या
गायक
​कलाकारांनी ​
धमाल गाण्याच्या कार्यक्रमामध्ये ठेका धरायला लावणारी अनेक सुमधुर गाणी सादर ​केली. यामध्ये 'आज फिर जिने कि तमन्ना है, '
​​
सत्यम शिवम सुंदरम',
'परदा है परदा' आदी गाण्यांचा समावेश होता. 
आबाल वृद्धांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. गाण्याच्या तालात आपले वय विसरून धुंद होऊन नृत्य देखील केले.
​टाळ्यांच्या आणि शिट्यांच्या गजरात कार्यकर्त्यानी दाद दिल्याने सभागृहाचे वातावरण नादमय झाले होते. ​
त्यामुळे हा गाण्याचा कार्यक्रम ​ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरला 
​आणि ​
हास्ययोगाच्या द्वी दशकपूर्तीला मनोरंजनाची सुरेल साथ
​मिळाली. ​
​​
कार्यक्रमाची संकल्पना
​निश्चल लताड यांची होती. ​
संदीप पंचवाडकर
​यांनी
कार्यक्रमाचे निवेदन
​केले
.
​तर 
संगीत संयोजन सईद बाबा खान यांचे
​होते.

Post a Comment

 
Top