Add

Add

0

    महाराष्ट्र केसरी पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन... 

पुणे (प्रतिनिधी):-महाराष्ट्र केसरीच्या गेल्या 56 वर्षांचा इतिहासावर प्रकाशझोत टाकणार्‍या  क्रीडालेखक संजय दुधाणे लिखित महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भूगाव येथील मामासाहेब मोहोळ कुस्तीनगरीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वास नांगरे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगांवकर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, लेखक संजय दुधाणे उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर महाराष्ट्र केसरी किताब हा राज्याचा गौरव आहे असे सांगून नामदेव शिरगांवकर म्हणाले की,  महाराष्ट्र केसरीच्या गेल्या 56 वर्षांच्या  इतिहासाला हिंदकेसरी यशोगाथा या पुस्तकामुळे उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब म्हणाले,  कुस्तीवर आणि यशस्वी मल्लांवर पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे हे काम युवा लेखक संजय दुधाणे हे करीत आहेत. आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याचा सचित्र इतिहास महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाद्वारे प्रथमच प्रकाशित होत आहे. 80 पानी पुस्तकात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा श्रीगणेशा कसा झाला, कुस्ती अधिवेशने कधी झाली, कुस्तीगीर मानधन योजना विषयांवर संग्राह्य माहिती आहे. प्रा. दुधाणे यांनी लंडन व रिओ ऑलिम्पिकचे वृत्तांकन केले आहे. महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असून आता 51 वा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेसह दुसरी आवृत्ती नववर्षात प्रकाशित केली जाणार आहे.

Post a Comment

 
Top