Add

Add

0

पिरंगुट(प्रतिनिधी):- पन्नास वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत अनेक संकटे आली, प्रचंड आरोप झाले, आरोग्यवि षयक अडचणी आल्या तरी पवार साहेबांनी न डगमगता मोठ्या हिंमतीने त्याचा सामना केला. राजकारणातील कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचा हा लढाऊ बाणा अंगीकारल्यास राजकीय जीवनात ते यशस्वी होतील. शरद पवार हे कठीण प्रसंगावर मात करणारे प्रेरणास्त्रोत आहेत, असे मत मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले.


मुळशी तालुक्यातील कोळावडे  येथील विद्यालयात जेष्ठ नेते शरद पवार यांचे वाढदिवसानिमीत्त माजी सभापती महादेव कोंढरे यांचे वतीने इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना “21 अपेक्षित संच वाटप समारंभा’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्या राधिका कोंढरे उपस्थित होत्या. यावेळी माजी सभापती महादेव कोंढरे, कोळावडे ग्रामपंचायतीचे सरपंच सयाजी आढाव, माजी सरपंच अंकुश उभे, दत्तात्रय उभे, नामदेव मारणे, मुख्याध्यापक काशीद सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी सभापती महादेव कोंढरे म्हणाले, पवार साहेबांमुळे आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना पंचायत राजव्यवस्थेत काम करण्याची संधी मिळाली. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवित आहे. मुख्याध्यापक काशीद यांनी यावेळी प्रास्तविक केले. तुकाराम उभे यांनी सूत्रसंचालन केले तर, वैशाली बारणे यांनी आभार मानले.


Post a Comment

 
Top