Add

Add

0
              यासाठी मध्यस्थी याचिका(Intervention Application)मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल ! 

पुणे (प्रतिनिधी):- भारतीय संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अयोध्या येथील रामजन्मभूमी बाबरी मस्जिदच्या विवादास्पद २.७७ एकर भूमीबद्दलचा ज्वलंत प्रश्‍न हिंदू व मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सामोपचाराने व सामंजस्याने सोडवावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा आदर करून विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका  (Intervention Application) दाखल करण्यात आली. 
या मध्यस्थी याचिकेमध्ये खालील मुद्यांचा समावेश आहे. 
1. प्रभु श्रीरामचंद्रांचे एक भव्यदिव्य आणि सुंदर असे मंदिर प्रत्यक्ष मूळ रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 2.77 एकर विवादास्पद भूमी वरच सर्व विवाद मिटवून, सर्व पक्षीयांची मान्यता मिळवून बांधण्यात यावे.
2. श्रीरामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 2.77 एकर जमीनी लगत असलेल्या 67 एकर भारत सरका रद्वारा अधिग्रहित/संपादित संपूर्णपणे मोकळी व पडीक जमीन,शासनातर्फे,मानवता,सहिष्णुता व विश्‍व शांतीचा संदेश देणार्‍या, भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे एक मूर्तिमंत स्वरूप म्हणून उदयास येऊ शकेल अशा ‘विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन’च्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, ज्यायोगे त्यावर हिंदू, इस्लाम, ख्रिश्‍चन, बौध्द, शीख, जैन, पारसी, ज्यू अशा विविध धर्मींयांची भव्यदिव्य व सुंदर अशी मंदिर, मस्जिद, चर्च, विहार, गुरुद्वारा इ. प्रार्थनास्थळे, त्या त्या धर्मांच्या संकल्पना व श्रद्धेनुसार उभारता येऊ शकतील. 
3. अयोध्या येथील मूळ रामजन्मभूमीच्या जागेवर प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य व सुंदर मंदिर व त्या लगतच्या मोकळ्या व पडीक जागेत विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन समन्वयाने व सामंजस्याने उभारण्यासाठी, भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत देशातील नामवंत व जाणकार शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक भान असलेले विविध पक्षातील व धर्मातील नेते आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक सत्तावीस (27) सदस्यीय अखिल भारतीय सुकाणू समिती स्थापन करून हा प्रश्‍न सामोपचाराने सोडविण्यात यावा. 
एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, नालंदा विद्यापीठाचे कुलपती  आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या  विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन या अभूतपूर्व अशा ऐतिहासिक स्वरूपाच्या प्रस्तावाबद्दल आपल्या भारत देशाच्या हिताच्या व सर्व समाजाच्या कल्याणाच्या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तत्त्वचिंतक, एक थोर राजनैतिक विचारवंत,  डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी आपली प्रांजळ भावना व्यक्त करताना अगदी सकारात्मक भाषेमध्ये सांगितले की, ‘एक दिवस अयोध्या येथील विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन हे संपूर्ण जगाचे मानवता धर्माचे विश्‍वतीर्थ म्हणून उदयास येईल आणि संपूर्ण जगाला मानवतेचा, सर्वधर्मसमभावाचा आणि विश्‍वशांतीचा संदेश देईल आणि 21व्या शतकामध्ये आपला भारत देश ‘ज्ञानाचे दालन’ व ‘विश्‍वगुरू’ म्हणून उदयास येईल.’ 
अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिरासहित मानवता व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या  विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या उभारणीमुळे अयोध्या नगरी ही केवळ भारताचीच नव्हे तर, संपूर्ण जगाची सांस्कृतिक व अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाईल, असाही विश्‍वास डॉ.  वेद प्रताप वैदिक यांनी व्यक्त केला.


Post a Comment

 
Top