पुणे (प्रतिनिधी ):-महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत  दुर्गा महिला  मंचच्‍या  पुणे जिल्हाध्य क्षपदी महिला  व बालविकास विभागाच्‍या सहायक आयुक्त श्रीमती सुवर्णा पवार यांची  निवड करण्‍यात आली.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्‍या पुणे समन्वय समितीची बैठक महासंघ कार्यालयात संपन्‍न झाली. त्‍यावेळी ही निवड जाहीर करण्‍यात आली. निवडीबद्दल महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सरचिटणीस पुणे इंजि विनायक लहाडे, कोषाध्‍यक्ष मोहन साळवी, राज्‍य संघटक ए.ए. मोहिते, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,पी.डी.शेंडगे,एस.डी. कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.
दुर्गामंचच्‍या इतर सदस्‍यपदी इंजिनिअर शीतल सेवतकर, बार्टीच्‍या निबंधक सविता नलावडे, सहायक आयुक्‍त धर्मदाय कांचन जाधव,बालविकास प्रकल्‍प अधिकारी सुहिता ओहाळ, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अनुराधा ओक, आरोग्‍य विभागाच्‍या भावना चौधरी,
 माहिती अधिकारी वृषाली पाटील आदींचा समावेश आहे.  दुर्गा मंचच्‍या वतीने सर्व शासकीय खात्यात महिला बैठका घेण्यात येणार  असून सर्व विभागातील महिला अधिका-यांनी दुर्गा मंचमध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन सुवर्णा पवार यांनी केले.   महासंघाच्‍या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.  5 डिसेंबर रोजी  मुंबई  येथे होणा-या राज्य बैठकीची माहिती देण्यात येऊन सर्वांना  उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अभियांत्रिकी कालेज,(सीओइपी) पुणे च्या प्राध्यापक संघटनेच्‍या  11 डिसेंबरच्‍या  बेमुदत उपोषण आंदोलनास महाराष्‍ट्र  राजपत्रित अधिकारी महासंघाने  पाठिंबा जाहीर करण्‍यात आला.