Add

Add

0
खेळाडूंच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपा’सह आम्ही कटिबद्ध आहोत...           
पुणे(प्रतिनिधी):- भारतीय जनता पार्टी नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभी राहिली आहे.मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्याची प्रचीती सर्वाना आलेली आहे.त्याचप्रमाणे वेदांत दुधाने हा कोथरूडमधील उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याच्यासह इतर सर्वच खेळाडूंच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपा’सह आम्ही कटिबद्ध असून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू,असे आश्वासन कोथरूड बावधन प्रभागाच्या भाजपा नगरसेविका अल्पना वरपे यांनी दिले. 
महात्मा सोसायटीजवळील कृष्णलीला टेरेस परिसरात असणार्‍या श्रीदत्त मंदिर देवस्थानच्या वतीने जिल्हास्तरीय धर्नुविद्या स्पर्धेत सुवर्ण हॅटट्रिकसह वर्षभरात पदकांचा रौप्य महोत्सव करणार्‍या वेदांत संजय दुधाणेंचा, नगरसेविका अल्पना वरपे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन विशेष गौरव करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्री दत्त मंदिर देवस्थानचे विश्वस्त रविंद्र दगडे, रेवजी औटी,सुधीर देशपांडे,शांताराम डफळ,कृष्णा वाघ,वंदना दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 गतवर्षी देशात प्रथमच झालेल्या 9वर्षाखालील राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत, ऑलिम्पिक प्रकारात सुवर्ण पदकासह देशात सर्वप्रथम येण्याचा पराक्रम वेदांत संजय दुधाणे याने केला होता. डिसें बरच्या शेवटच्याआठवडयात झालेल्या जिल्हास्तरीय धर्नुविद्या प्रकारात सलग तीन सुवर्णपदकाचा त्याने वेध घेतला अन् सोनेरी हॅटट्रिकचा करिश्मा घडविल्याबद्ल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. 
वयाच्या दहाच्या वर्षी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत तो सगलपणे, न थकता 3 क्रीडाप्रकारात अव्वल ठरला. इंडियन बो 20 मीटर, इंडियन बो 30 मीटर पाठोपाठ रिकर्व्ह 30 मीटर प्रकारात त्याने सर्वाधिक गुणांची कमाई करीत, सुवर्ण वेध साधला. या पदकांमुळे त्याने अवघ्या दोन वर्षांत तिरंदाजीतील पदकाच्या यशाचे रौप्यमहोत्सवी पल्ला पार केला आहे. 12 सुवर्ण,5 रौप्य, 8 कांस्यपदकाची जादू त्याने राष्ट्रीय, राज्य स्पर्धेत घडविली आहे. वयाच्या तुलनेत त्याची वाटचाल कौतुकास्पद आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रणजीत चामले यांच्यासह सुधीर पाटील, ओंकार घाडगे, राम शिंदे, अनिल सोनावणे या प्रशिक्षकांच्या जोरावर आर्चर्स अ‍ॅकडमीसह तो पुण्याचा, महाराष्ट्राचा झेंडा फडकवित आहे.  

Post a Comment

 
Top