Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):-'भाजपची सत्ता आली तशी देशात, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढायला लागली. शेतकरी आत्महत्या करतोय तर माता-भगिनींवर अत्याचार वाढत चाललेत.कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली असून सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. केवळ फसवेगिरी करणारे, हे सरकार आहे असा ‘हल्लाबोल’ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महागाई, पेट्रोल दरवाढ,नोटाबंदी,जीएसटी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपा सरकार विरोधात बुधवारी पुण्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी मोर्चा काढला होता.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा अलका टॉकीज येथून, केळकर रस्ता,शनिवार पेठ,कन्याशाळा,अप्पा बळवंत चौक,प्रभात टॉकीज,शनिवारवाडा,सूर्या हॉस्पिटल,साततोटी चौक,कमला नेहरू हॉस्पिटल,सदानंद नगर झोपडपट्टी मार्गे नरपतगिरी चौक,जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.   
आंदोलनात महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती.यावेळी जीएसटी रद्द झालाच पाहिजे,दुधाला भाव मिळायलाच हवा अशा प्रकारचे फलक आंदोलक महिलांच्या हातात होते.या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष खा.वंदना चव्हाण,जालिंदर कामठे,चेतन तुपे,अंकुश काकडे,भगवान साळुंखे,रवींद्र माळव दकर,माजी आमदार कमल ढोले-पाटील,बापू पठारे,अशोक पवार,वैशाली बनकर,चंचलाकोद्रे,अश्विनी कदम,सुभाष जगताप,विशाल तांबे,प्रदीप गायकवाड,योगेश ससाणे,महेंद्र पठारे,भैयासाहेब जाधव, अशोक राठी,रुपाली चाकणकर,मनाली भिलारे,राकेश कामठे,स्वप्नील खडके,ऋषी परदेशी,इकबाल शेख, भोलासिंग अरोरा,शशिकांत तापकीर,मिलिंद वालवडकर,नंदकिशोर काळभोर,वैशाली नागोडे, सुरेश घुले,पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्या करिता हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असून, राज्याचे महत्वाचे प्रश्न या आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेवर येऊन ३ वर्षे ओलांडली आहेत. या काळात ते अपयशी ठरले आहेत, केवळ पोकळ आश्वासन देणे आणि जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. दिनांक १ ते १२ डिसेंबरमध्ये यवतमाळ ते नागपूर असा १५३ किलोमीटर पदयात्रेद्वारे आंदोलन करण्याचा संकल्प राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या राज्यव्यापी आंदोलनाचा समारोप होणार आहे,' असे अजित पवार यांनी सांगितले. 

'सर्व स्तरावर राज्य सरकार भरकटलेले आहे. अनेक पोकळ अश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. विना अट आणि सरसकट कर्ज माफी, शेतीमालासाठी हमी भाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत, महिला सुरक्षा, वाढती महागाई, पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढ, शिक्षण आणि शिष्यवृत्तीमधील गोंधळ, भारनियमन, नोटबंदी, जीएसटी, निकृष्ट नागरी सुविधा आणि आरोग्य व्यवस्था, कुपोषण, बालमृत्यू, शेती, उद्योग, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यांचा बोजवारा आणि सरकारच्या एकूणच अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी व तसेच दुर्बल घटकांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे. हे आंदोलन समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. त्यामुळे सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हावे,' असे खा. वंदना चव्हाण म्हणाल्या.

Post a Comment

 
Top