Add

Add

0
                  16  17 रोजी साहित्य संमेलनमान्यवर साहित्यिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती

 पुणे (प्रतिनिधी):- श्रमिककष्टकरी व तळागाळातल्या अठरापगड जातींची वेदना आपल्या साहित्यातून समाजासमोर मांडणार्या कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर 16 डिसेंबरपासून सीमाभागातील बेळगाव येथे विचारमंथन होणार आहेज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले आणि बेळगावातील विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने बेळगाव येथील मराठा मंदिर सभागृहात 16  17 डिसेंबर रोजी 8 वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहेसंमेलनस्थळाचे कॉम्रेड गोविंद पानसरे नगरी असे नामकरण करण्यात आले असूनयामध्ये बेळगावसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील नामवंत साहित्यिक व चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर स्थिरावलेली नसून श्रमिकांच्यादलितांच्या व स्त्रियांच्या तळहातावर स्थिरावलेली आहे’, अशी अण्णा भाऊंची लेखनांतर्गत भूमिका आहेअण्णा भाऊंच्या लेखनामागील ही भूमिका व प्रेरणा आजच्या काळातही तितकीच महत्वाची असूनआजच्या पिढीला श्रमिककष्टकरीवंचित व अभावग्रस्तांच्या जगाकडे डोळस संवेदनशीलतेने पाहत विचारप्रवण व लिहिते करण्याच्या उद्देशाने हे अनोखे संमेलन दरवर्षी आयोजित करण्यात येतेयापूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूरअहमदनगरनांदेडना गपूरनाशिकसावंतवाडीबार्शी येथील यशस्वी आयोजनानंतर यंदाचे आठवे संमेलन बेळगावात होत आहे. 
शनिवार दिनांक 16 रोजी संमेलनाला प्रारंभ होणार असूनसकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहेयानंतर सकाळी 11 वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक डॉजब्बार पटेल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असूनसंमेलनाध्यक्षपदी हैदराबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठातील प्राडॉमाया पंडित असणार आहेततसेच बेळगावच्या महापौर सौसंज्योत बांदेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
यानंतर दुपारी 2.30 ते 4 या वेळेत ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून श्रमिकांच्या लढ्यांना मिळणार्या प्रेरणा’ या विषयावर प्रातानाजी ठोंबरे(बार्शी-सोलापूरयांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असूनयामध्ये ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर (पुणेआणि प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजीसहभागी होणार आहेत. 
दुपारी 4.30 ते 6 या वेळेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड डॉभालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुढील आव्हाने’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहेयानंतर सायंकाळी 6.30 वाजता होणार्या शाहिरी जलशात शाहीर सदाशिव निकम (कोल्हापूर), शाहीर शीतल साठे (सातारायांच्यासह स्थानिक कलाकार अण्णाभाऊंची गीते सादर करणार आहेत. 
रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या परिसंवादात ‘माझी मैना गावावर राहिली : एक चिकित्सा’ या विषयावर बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक दळवी भाष्य करतीलत्यानंतर 11 ते 1 या वेळेत ‘कॉअण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वर्ग व जात जाणीवा’ या विषयावर निवृत्त अप्पर पोलिस महासंचालक उद्धव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या परिसंवादात ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर (मुंबईव ज्येष्ठ नेते डॉअच्युत माने (निपाणीसहभागी होणार आहेतदुपारी 2.30 ते 4 यावेळेत प्रातिनिधीक कवी संमेलन होणार असूनयामध्ये वीरधवल परब (वेंगुर्ला), डॉअनुजा जोशी (गोवा), फेलिक्स डिसोझा (वसई), गणेश विसपुते (पुणे), डॉसुनंदा शेळके (जयसिंगपूरया मान्यवरांसह स्थानिक कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. 
यानंतर दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा समारोप सोहळा होणार असूनज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉगणेश देवी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेतया संमेलनात साहित्यप्रेमीकार्यकर्तेशि क्षकप्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेतसेच नोंदणीसाठी 9448347452अथवा  9141360107 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन संयोजन समितीचे मार्गदर्शक कॉम्रेड कृष्णा मेणसेस्वागताध्यक्षा डॉ.संध्या देशपांडेकार्याध्यक्ष कॉम्रेड नागेश सातेरीकार्यवाह प्राआनंद मेणसेखजानिस अनंत जाधव व समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top