Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी ):-विवेकानंद केंद्र कन्याकुमारी,शाखा पुणे व वृंदावन फाऊंडेशन यांच्या वतीनेएकनाथ रानडे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे माजी सचिव) यांच्या जीवन कार्याचा प्रवास दाखविणार्‍या ‘एकनाथ एक जीवन एक ध्येय’ चित्रपट पहाण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहेे. रविवार, दिनांक 3 डिसेंबर रोजी आयनॉक्स सिनेमाघर, विधानभवना समोर, बंड गार्डन रोड येथे हा शो होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. अशी माहिती सुधीर जोगळेकर (सचिव, ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग) यांनी दिली.
एकनाथ रानडे यांचा स्वामी विवेकानंद यांनी अनेक अडथळ्यातून केलेल्या कन्याकुमारी येथील शिलास्मारक बांधणीतील योगदान, घेतलेले परिश्रम असा उद्बोधक जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. 
चित्रपटाच्या प्रवेशिका विवेकानंद केंद्र 21,निष्ठा,सदाशिव पेठ आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग,अश्‍विनी हाईटस्, ग्राहक पेठ,टिळक रोड येथे सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30 या वेळात उपलब्ध होणार आहेत. 

Post a Comment

 
Top