Add

Add

0
लोणी  काळभोर (प्रतिनिधी):-एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे तर्फे शनिवार दि.16 डिसेंबर व रविवार दि.17 डिसेंबर2017 या दरम्यान जागतिक पातळीवरील दोन दिवसीय उद्योजकता संमेलन राजबाग, लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आले आहे. ई-कॅफे, एफआयसीसीआय आणि एमसीसीआयए यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठे उद्योजकता संमेलन भरणार आहे.
या दोन दिवसीय उद्योजकता संमेलनाचे शनिवारी सकाळी 10.00वाजता उद्घाटन होणार आहे.या समारंभासाठी भारताच्या अन्न प्रक्रिया विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील -निलंगेकर, निती आयोगाच्या अटल सृजन मोहिमेचे अतिरिक्त सचिव व संचालक श्री. आर. रामानंद, इंडिया-जपान पार्टनरशिपचे अध्यक्ष संजीव सिन्हा आणि अमेरिकेमधील मकरंद जावडेकर व कॅनडा येथील राज बरार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. विद्या जयरामन या बीजभाषण देणार आहेत. 
जगातील सहा खंडातील 105 शहरापैकी व त्यापैकी भारतातील25शहरांचे 3हजार उद्योजकांच्या बैठका घेण्यात आल्या आणि जगातील 45 हजार उद्योजक जोडले गेले आहेत. 
एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेतर्फे आयोजित केलेल्या या उद्योजकांसाठीच्या संमेलनात नवनवीन कल्पना, प्रतिसाद, तसेच, हजारो उद्योजकांना प्रेरणा देण्याचे कार्य या संमेलनातून होणार आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मते तरूण उद्योजक नवीन भारताची निर्मिती करतील. भारत सरकारचे उद्योजक धोरण ठरविण्यासाठी या संमेलनातील चर्चेचा उपयोग होईल.  
या संमेलनात शहरातील ई-कॅफेचा महिला उद्योजक पुरस्कार, महाराष्ट्र तरूण उद्योजक पुरस्कार व इंडिया टेक-आयडिया पुरस्कार/जागतिक टेक आयडिया पुरस्कार हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
या उद्योजक संमेलनाचा समारोप समारंभ रविवारी दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

Post a Comment

 
Top