Add

Add

0

जिल्ह्यात “स्मार्ट आंगणवाडया’ बांधण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातून पंचायत समितीमार्फत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर तीन गुंठे जागा उपलब्ध करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव ग्राह्य धरण्यात येणार आहे.राणी शेळके, सभापती – महिला व बालकल्याण जिल्हा परिषद. 

पुणे (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यात नव्याने शंभर “स्मार्ट अंगणवाड्या’ बांधण्यात येणार आहे. या सर्व अंगणवाड्या प्रामुख्याने सीएसआर फंडातून उभारण्यात येणार असून, प्रत्येक अंगणवाडीसाठी 10 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. यासाठी यासाठी तीन गुंठ्याची जागा उपलब्ध असावी, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दिली.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अंगणवाड्यांची सोय नाही. त्यामुळे मुलांना झाडाखाली, वऱ्हांड्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी बसण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते. मुलांना उन्हात बसावे लागते तर पाऊस आणि थंडीच्या दिवसात मुलांना त्रास सहन करावा लागतो. काहीवेळी धोकादायक पस्थितीत मुले शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात अनेकदा जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडले होते. तसेच नव्याने अंगणवाडी बनवण्याचे प्रस्ताव दिले होते. मात्र निधीअभावी या अंगणवाड्यांची पूर्तता होत नव्हती. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या या मोडकळीस आल्या तरी त्याची डागडुजी झाली नाही. मात्र आता सीएसआर फंडातून निधी देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक आंगणवाडीला 10 लाख रूपयांचा निधी देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शंभर “स्मार्ट आंगणवाडया’ तयार होणार आहेत. सुरूवातीला 10 आंगणवाड्यांचा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात शंभर आंगणवाड्या उभारण्यात येणार आहे. प्रत्येक अंगणवाडीसाठी साधारण तीन गुंठ्याची जागा उपलब्ध करावी लागणार आहे. ही जागा स्थानिक ग्रामपंचायतीने यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून ना हारकत प्रमाणपत्र द्यायचे आहे. हा प्रस्ताव पुढे पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार आहे. हे सर्व प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाठवून ते प्रत्येक आंगणवाडीसाठी 10 लाखांचा निधी पुरवणार आहे. त्या निधीतून या आंगणवाड्या स्मार्ट बनवण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top