Add

Add

0


                    अष्टपैलू व्यक्तिमत्व : शांताराम कारंडे
  आढावा ... डॉ.शांताराम कारंडे यांच्या कार्याचा..!!*
कोण म्हणतो की श्रीमंत हा अतीश्रीमंत होतो आणि गरीब हा गरीबच राहतो. मेहनतीला, स्वकर्तृत्वाला व ध्येयाने पछाडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीला सोबत नशिबाची साथ असेल, लक्ष्मीची कृपा असेल, सरस्वतीचा वरदहस्त असेल तर तो कितीही गरीबीतून का येईना ...एक ना एक  दिवस यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचल्याशिवाय राहत नाही. मनापासून केलेल्या  मेहनतीला एक दिवस यश मिळतेच. सर्वांच्याच बाबतीत असे घडते असेही नाही. खूप कमी व्यक्ती अशा असतात ज्यांना एकाच वेळी श्रीकृष्णाची बुद्धी, प्रभू श्रीरामाची वृत्ती, एकलव्याची निष्ठा, लक्ष्मीची कृपा, नशिबाची साथ अन सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला असतो. अशाच  भाग्यवान लोकांपैकीच एक म्हणजे *डॉ. शांताराम कारंडे.* 
         डॉ . शांताराम कारंडे हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे शंभर हत्तींच्या बळाला नमवेल अशी तल्लख बुद्धी, साधा सरळ विचार, सकारात्मक आचार, स्पष्ट वाणी, सरस्वतीची लेखणी,  माणसाची पारख करण्याची शक्ती व वाडीलधाऱ्यांवर भक्ती असे एकापेक्षा एक कलागुण ठासून भरलेले आहेत. धारावी मधील दहा बाय दहाच्या खोलीतून आज ते इतक्या मोठ्या पदांवर कार्यरत राहण्याला फक्त त्यांची मेहनत करण्याची चिकाटी कामी आली आहे. आजसुद्धा ही व्यक्ती न थकता, सलग 16 ते 18 तास विविध कामात व्यस्त असते. एकाच वेळी व्यवसाय सांभाळत, सामाजिक बांधिलकी जपत, गरजवंतांना सतत सहकार्य करीत कविता व लेखनाचा छंद जोपासत समाजकार्य व  सक्रिय राजकारणामध्ये व्यस्त आहेत. 
         व्यवसायाने  आर्किटेक्ट व बिल्डर असलेले डॉ. कारंडे यांच्याकडे लक्ष्मीचा वावर योग्य प्रमाणात असून लक्ष्मी सोबत सरस्वतींचा सुद्धा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. याचे उत्तम उदाहरण  म्हणजेच त्यांची मराठी साहित्यावर असलेली जबर पकड.  व्यवसायासासोबत  त्यांनी  समाजकारणातून राजकारणाकडे प्रवेश करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्या पदाची जबाबदारी समर्थपणे ते साहित्यसेवा सुद्धा करत आहेत. आतापर्यत त्यांचे दहा कवितासंग्रह, अकरा कथासंग्रह,800पेक्षा अधिक लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. 900 पेक्षा जास्त कविता त्यांनी नुसत्या लिहल्याच नाहीत तर इतर अंकांमध्ये प्रकाशित केल्या आहेत. मनाने कवी असलेला हा माणुस शीघ्रकवी म्हणून प्रचलित आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हमजे मा. राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रभावित होऊन अवघ्या दोन तासात 'मनसे' या आद्याक्षरावर त्यांनी 40 चारोळ्या लिहून 'अंगार' नावाने प्रकाशित केल्या. त्यांच्या बऱ्याच कवितांना  पारी तोषिके प्राप्त झाली आहत. नक्षत्राचं देणं काव्यमंच' चे ते सरचिटणीस असून 2010मध्ये आखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनामध्ये कवीवर्य मंगेश पाडगांवकरांनी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. कारंडे यांच्या कवीभूमिकेबद्दल गौरव उदगार काढले होते. 
        डॉ. शांताराम कारंडे यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची दखल  घेऊनच श्रीलंकेच्या कोलंबो येथील एका विद्यापिठाने  त्यांना सन्मानपूर्वक  डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. इतकेच नव्हे  मराठी 'इ. टी.व्ही.' वर 'संवाद' या कार्यक्रमामध्ये पत्रकार राजु परुळेकर यांनी त्यांची मुलाखत प्रक्षेपित केली. डॉ. कारंडे हे डझनभर कंपन्यांचे पार्टनर असून सरासरी 63 विविध सामाजिक संघटनांवर कार्यरत आहेत. सामाजिक कार्य करण्यावर त्यांचा भर असून अनेक संस्थाना, मंडळांना सढळ हस्ते मदत करण्यात अग्रेसर राहिलेत. एका मराठी शाळेला त्यांनी80 हजार रुपयांचे 20 बैंचेस तर मालवणी येथील गांधी विद्यालयाला तीन लाख रुपयांचे बेंचेस त्यांनी मोफत प्रदान केलेत. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मदत तसेच शालोपयोगी वस्तूंचे वाटप, प्रियदर्शनी या शाळेला 22 हजार किंमतीचे वाद्यवृंद, सहाशेपेक्षा जास्त नागरीकांना मोफत 'पॅनकार्ड ' वाटप, 300 पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना ' जेष्ठ नागरीक कार्ड ' चे मोफत वाटप, मोफत आरोग्य शिबिरात अनेकांना मोफत चिकित्सा, चारकोप विभागात मोफत औषध फवारणी इ. अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे स्वखर्चाने राबविले आहेत. इतकेच नव्हे तर स्वखर्चाने विकत घेऊन वातानुकुलीत अतिदक्षता सोयी सुविधा असलेली रुग्णवाहिका 'संध्याकाळ' च्या संपादिका रोहिणी खाडीलकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण केली. आशा एकूण त्यांच्या चार अंबुलन्स लोकांना सेवा देत दिमाखात फिरत आहेत. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते सतत आयोजन करीत असतात. एक गटई कामगाराला दिलेल्या स्टॉल उदघाटना प्रसंगी तोंडातून निघालेला शब्द पाळत आजपर्यंत त्यांनी रुपये 25,000/- किंमतीचा लोखंडी कायमस्वरूपी स्टॉल दरमहा एकाला अशा 99 स्टॉलचे मोफत वाटप केलेले आहे. त्या माध्यमातून त्यांनी एकुण 100 कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. 
       राजकारणामध्ये असुन सुद्धा शुद्ध समाजकारण करणारा व समाजकारण करताना त्यामध्ये चुकूनही राजकारण न करणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता इतरांपेक्षा अगदी वेगळाच आहे. त्यांच्या आता पर्यंतच्या वाटचालीवरून एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना शंभर टक्के यश मिळणार व ते महाराष्ट्राचे लाडके नेते होणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही.त्यांच्या याच राजकीय वाटचालीस त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा !

                                                                                                                      - दिपक गुणाजी खेडेकर.

Post a Comment

 
Top