Add

Add

0
  जुन्नर (प्रतिनिधी):-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जुन्नर येथील शिवनेरी किल्लयावर कार्यक्रमास जात असताना, काही गुडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मात्र, याप्रकरणी पाेलीसांनी सदर गुंडावर तात्काळ एफअायअार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली असून हल्लेखाेर गुंडाना पाठीशी घालण्याचे काम पाेलीस प्रशासनाने केले अाहे. याप्रकरणाच्या निषेधार्थ नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने जुन्नर येथील शिव छत्रपती प्रवेशद्वार, जुने बसस्थानका जवळून  सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाच हजार नागरिकांच्या भव्य मूक माेर्चास सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे संघचालक श्री.अप्पा गवारे यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

संघ कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्लयानंतर, पाेलीसांनी मारहाण केलेल्या गुंडाच्या दबावाला बळी पडून विनाकारण त्यांची विराेधात तक्रार नाेंदवून घेतली. सदरची घटना ही सामान्य नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण करणारी असून पाेलीस व प्रशासनाला काळीमा फासणारी अाहे. या परिस्थिती करिता जबाबदार असणारे जुन्नर पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक कैलास घाेडके, , एपीअाय पदमभुषण गायकवाड व पीएसअाय साेमनाथ दिवटे या अकार्यक्षम पाेलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, जुन्नर शहर व परिसरात धुडगुस घालणाऱ्या धर्मांध गुंडावर कारवार्इ करावी, महिला व मुलींचे संरक्षणासाठी जुन्नर शहरात ‘निर्भया पथकाची’ स्थापना करावी, गाेवंश रक्षणसाठी स्वतंत्र पाेलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, जुन्नर शहरातील अतीसंवेदनशील भागांमध्ये छाेटया पाेलीस चाैक्या उभारुन गस्त पथकाची नेमणूक करण्यात यावी, साेशल मिडियावर सातत्याने महापुरुष व देवीदेवतांचे हाेणारे विटंबन राेखण्यासाठी चाैकशी हाेवून संबंधीतांवर कडक कायदेशीर करण्यात यावी अशाप्रकारचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात अाले. नागरी सुरक्षा समितीचा माेर्चाचे संयाेजन शामराव धुमाळ, संदेश भेगडे यांनी केले. 

Post a Comment

 
Top