Add

Add

0

  याच ठिकाणी 18 डिसेंबपर्यंत शेतकरी तांदूळ महोत्सवही होणार आहे.


पुणे (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातील देशी गायींचे पोषक दूध आणि या गायींवर आधारित औषधांबाबत अलीकडच्या काळात विविध संशोधने पुढे आली आहेत. देशी गायींबाबत शहरी भागात केवळ वाचायला मिळते किंवा चित्रातूनच त्या पाहायला मिळतात. मात्र, देशभरातील विविध देशी गायी एकाच छताखाली प्रत्यक्षात पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. देशी गायींचे पहिलेच राज्यस्तरीय प्रदर्शन आणि स्पर्धा मोशी येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे.याच ठिकाणी 18 डिसेंबर 
पर्यंत शेतकरी तांदूळ महोत्सवही होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे गोसेवा समितीच्या पुढाकाराने मोशीतील संत नागेश्वर उपबाजारच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.प्रदर्शनासाठी महारा ष्ट्राच्या विविध भागातून देशी गायी आणल्या जाणार आहेत.जर्सी प्राण्यांपेक्षाही जास्त दूध देणारी आपली भारतीय गाय गीर, थरपारकर, देवणी, लाल सिंधी, साहिवाल,लाल कंधार,खिलार,पंगानूर आदी जातीच्या गायी प्रदर्शनात असणार आहेत.
विविध जातींची देखणी वासरेही असतील. मेळाव्यामध्ये भारतातील देशी गायी पाहण्याची सुवर्णसंधी तर मिळेलच,
पण अनेक विकार बरे करणारी देशी गो आधारित औषधे विक्री केंद्रांचाही लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे देशी गो वंश आरोग्य विषयक पुस्तक प्रदर्शन, तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने, सर्वोत्कृष्ट देशी गायी स्पर्धा असे उपक्रमही असणार आहेत.
स्वावलंबी देशी गोपालक गोशाळा यांची माहिती देणारे दालन, सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने, गोपालक गोशाळा त्यांच्या गो उत्पादने, औषधे विक्रीसाठी दालन, देशी गायींच्या जाती गो विज्ञान विषयक माहिती देणारे चित्र प्रदर्शन, महिला बचतगट उत्पादने, शेतकरी गट उत्पादने आदी दलनेही असणार आहेत. तांदूळ महोत्सवामध्ये प्रामुख्याने मुळशी, भोर, वेल्हा, मावळ तालुक्यातील नसíगक सुवासिकता प्राप्त झालेला इंद्रायणी आणि आंबेमोहोरसह राज्यातील अनेक प्रकारचे तांदूळ उपलब्ध होणार आहेत.
शनिवार (2 डिसेंबर) रोजी सकाळी अकरा वाजता पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रशासकीय संचालक गोरख दगडे यांनी दिली.
देशी गायींच्या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना देशी गायींचे विविध प्रकार पाहावयास मिळतील. दहा ते बारा जातीच्या गायींचा प्रदर्शनात समावेश असेल.भरपूर दूध देणाऱ्या तसेच शेतीसाठी दणकट बैल देणाऱ्या जाती त्यात असतील. आता देशासह विदेशातील नागरिकांनाही भारतीय देशी गायींचे महत्त्व पटू लागले आहे. केवळ दूधच नव्हे, तर देशी गायींवर आधारित औषधांनाही महत्त्व आहे.त्यामुळे आता परदेशातही या गायींना मागणी आहे.
– रवी रबडे, पुणे गोसेवा समिती प्रमुख

Post a Comment

 
Top