Add

Add

0

विराजस कुलकर्णीचे सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण

मुंबई(प्रतिनिधी):-सध्या सिनेसृष्टीत स्टार किड्सचा च बोलबाला असल्याचे दिसतेय. बॉलिवूडमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, इशान खट्टर हे चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच मराठी चित्रपटसृष्टीतही स्टार किड्स आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सत्या मांजरेकर,अभिनय बेर्डे,स्वानंदी टिकेकर,सखी गोखले यांनी दमदार पदार्पण केल्यानंतर आता आण खीन एक स्टार किड्स मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणा साठी सज्ज झाला आहे. तो आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचा मुलगा विराजस कुलकर्णी. विराजस लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
अजय नाईक दिग्दर्शित 'होस्टेल डेज' या चित्रपटात विराजस भूमिका साकारणार आहे. 'होस्टेल डेज' हा चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहरे, आरोह वेलणकर, अक्षय टकसाळे आणि संजय जाधव यांच्या भूमिका आहेत. विराजस अभिनेत्याबरोबर एक दिग्दर्शकही आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्यांने अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामं केलं आहे.  

Post a Comment

 
Top