Add

Add

0
पुणे (विशेष प्रतिनिधी):- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हस्तांतरित झालेल्या अॅमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडून पहिल्यांदाच सहा गावातील अॅमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव करण्यात येत असून या लिलावातून पीएमआरडीए विविध प्रकल्पांसाठी निधी उभारणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अॅमिनिटी स्पेसच्या जागा हस्तांतरित झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतरित झालेल्या जमिनी आणि अॅमिनिटी स्पेसच्या जागांचा वापर कशा करायचा याची नियमावली नव्हती. नगरविकास विभागाने याबाबत जमिनीचे विल्हेवाट अधिनियम तयार केले आहे. त्यानुसार अॅमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडून पहिल्यांदाच अॅमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव होणार आहे. सुरुवातीला शाळा आणि हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेल्या मांजरी बु., वाघोली, पिसोळी, हिंजवडी, बावधन बु., म्हाळुंगे येथील भूखंडाचा लिलाव करण्यात येणार आहे.
शाळा आणि हॉस्पिटलसाठी या अॅमिनिटी स्पेस आहेत. हे लिलाव ऑनलाईन होत असून त्यासाठी नागरिकांना ई बोली लावावी लागणार आहे. या जागांचा वापर ज्या हेतूसाठी आरक्षित आहे, अशा शाळा आणि हॉस्पिटल या हेतूसाठीच या जागांचा वापर संबधितांनी करणे आवश्‍यक आहे ज्या लोकांना शाळा आणि हॉस्पिटल उभारायची इच्छा आहे. त्या सर्वांना या लिलावात भाग घेता येणार आहे. या जागांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात आहे.
ई लिलाव पध्दतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा धारक यांच्यासाठी येत्या शुक्रवारी (दि.15) पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा पूर्व बैठक दि.20 डिसेंबर 2017 रोजी दुपारी तीन वाजता पीएमआरडीएच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ई लिलाव प्रक्रिया दि. 3 जानेवारी 2018 ते 5 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
जागांच्या लिलावासाठी आधारभूत किंमत निश्‍चित झाली आहे. या जागांच्या लिलावातून पीएमआरडीए निधी उभारणार आहे. हा निधी पीएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो आणि रिंगरोडसह इतर विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे. ज्या संस्था किंवा व्यक्तींना जागा हवी आहे, त्यांनी ऑनलाइन लिलावमध्ये सामील व्हावे, असे आवाहन पीएमआरडीए ने केले आहे.

Post a Comment

 
Top