Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी):-अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या रुपेरी पडद्यावर दिसत नाही. पण तरीही तिच्याबद्दल प्रेक्षकांना एक वेगळीच ओढ कायम आहे. याबाबत बोलताना राणी म्हणाली, मी माझं खरं आयुष्य कधीच पडद्यावर दाखवत नाही. भूमिकेतील माझी प्रत्येक हालचाल ही त्या भूमिकेचीच असते. मी तीच होऊन जाते. त्यामुळेच कदाचित प्रेक्षक मला त्या त्या भूमिकेसाठीच ओळखतात.याचाच अर्थ राणी मुखर्जी भूमिका करताना देहभान विसरते हेच खरं. आदिराच्या जन्मानं
तर आता ती आपल्या ‘हिचकी’ या नव्या सिनेमाबाबत उत्सूक आहे.
‘हिचकी’मध्ये राणी एका अशा महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे जी टॉरेंट सिंड्रोम हा नर्व्हस सिस्टीमचा विकार झालेली आहे. त्यामुळे तिला वारंवार उचकी येते. पण तरीही ती टीचर बनण्याच्या आपल्या स्वप्नाआड हा आजार येऊ देत नाही. या सिनेमाबाबत बोलतानाच तिने आपल्या स्टाईलबद्दल सांगितलं. ती म्हणते, भूमिका करताना मी राणी मुखर्जी नसते. या राणी मुखर्जीला मी पूर्णपणे हटवून मगच कॅमेरासमोर उभी राहाते. जेव्हा तुम्ही तुमचं खरं आयुष्य विसरून भूमिकेत शिरता तेव्हा ती भूमिका चांगलीच होते. राणी, कमालच आहे तुझी…

Post a Comment

 
Top