Add

Add

0
सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेत इंटरनॅशनल सक्सेस कोच सुनील पारेख यांचे एसआयएमएमसीच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे (प्रतिनिधी):-सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनतर्फे (एसआयएमएमसी) नुकतेच पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड या रंजक व माहितीपूर्ण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेचे संचालन इंटरनॅशनलसक्सेस कोच व मनोबल तज्ज्ञ सुनील पारेख यांनी केले.एमबीए प्रथम वर्ष,एमबीए द्वितीय वर्ष,पीजीडीएम या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सर्व शिक्षक असे 100 हून अधिक लोक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. 
सुनील पारेख यांनी घेतलेले दमाईंड पॉवर अनलिमिटेड हे सत्र उपस्थित श्रोतृवृंदाला मनाच्या शक्तीचा फायदा घेऊन आपल्या मेंदूंचे सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. याप्रसंगी सुनील पारेख म्हणाले, मानवी मेंदू हे अफाट ताकदवान यंत्र आहे, जे एखाद्या महासंगणकापेक्षाही उत्तम व वेगवान पद्धतीने प्रचंड व विखुरलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असते. पण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की मानव प्राणी आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर करत नाहीत आणि वय वाढेल तसे मेंदूच्या वापराची टक्केवारी कमी होत जाते. आपल्या घरगुती जीवनशैलीमुळे बहुतांशी हा परिणाम घडतो, कारण आपण मेंदूचे सुप्त सामर्थ्य शोधण्यासाठी क्वचितच इतरत्र जातो. 
या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना कल्पकतेला चालना देऊन समस्या हाताळण्याच्या विविध अभिनव पद्धती शिकायला मिळाल्या. अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच चर्चेसाठी आवश्यक विविध तंत्रे व अत्याधुनिक मन साधनांवर प्रभुत्व कसे मिळवावे, याचेही ज्ञान त्यांना झाले. लक्ष केंद्रित राहण्यासाठी, सुप्त मनाशी संर्पक ठेवण्यासाठी आणि ध्येय गाठण्यास सकारात्मक राहण्यासाठीची विविध साधने सहभागींना शिकता आली. एखाद्याने आपले ध्येय गाठण्यासाठी सुप्त मनाच्या ताकदीचा कसा वापर करावा, यावर भाषणाचा भर होता. 
यासंदर्भात ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आमच्या संस्था विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक गोष्टी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा व प्रशस्त कॅम्पसच देत नसून त्यांच्या कल्याणकारी विकासासाकडेही आम्ही लक्ष पुरवतो.”


Post a Comment

 
Top