Add

Add

0


पुणे: -‘शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच संविधानाचे मुख्य उद्दीष्ट आहे. गरीब-श्रीमंत अशी दरी नष्ट करणे, भारताला खर्‍या अर्थाने सार्वबहुमत्व सामाजिक धर्म निरपेक्ष बनविणे हे देखिल संविधानाचे उद्दीष्ट आहे. सदर उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संविधान प्रथम समजून ते आचरणात आणले पाहिजे,’असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. 
‘ए.के.के.न्यु लॉ अ‍ॅकॅडमी’च्या वतीने आज शनिवारी ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. 
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम.सी.ई. सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एम.सी.ई. सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, डॉ.रशिद शेख (प्राचार्य, ए.के.के.न्यू लॉ. अ‍ॅकॅडमी), प्रा.मुजफ्फर शेख, डॉ. मोरेश्‍वर कोठावदे उपस्थित होते.
डॉ. पी.ए.इनामदार बोलताना म्हणाले,‘भारतीय संविधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना बहुमोल देणगी दिली आहे. प्रत्येक भारतीयाने चांगल्या स्वरूपाचे शिक्षण घेऊन संविधानाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध व परिपूर्ण बनविले पाहिजे.’
 डॉ.रशिद शेख (प्राचार्य, ए.के.के.न्यू लॉ. अ‍ॅकॅडमी) यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेसिन्टा बॅस्टियन यांनी केले. तर डॉ. मोरेश्‍वर कोठावदे यांनी आभार मानले.
डॉ.रशिद शेख बोलताना म्हणाले, ‘संविधान देशाचा आत्मा आहे. संविधानाचे महत्व समजण्यासाठी आणि याबाबत जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Post a Comment

 
Top