Add

Add

0

काही कलाकार विशिष्ट प्रकारच्या भूमिकेमुळे स्मरणात राहतात, काही भूमिका कलाकारांमुळे अजरामर होतात.मराठीसोबतच हिंदी चित्रपट सृष्टी तही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे...

काही कलाकार विशिष्ट प्रकारच्या भूमिकेमुळे स्मरणात राहतात, काही भूमिका कलाकारांमुळे अजरामर होतात. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार हे कळल्यावर सगळ्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. लवकरच त्यांचा 'राष्ट्र' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनलच्या बॅनरखाली राष्ट्र या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखन आणि संकलनाची जबाबदारी इंदरपाल सिंग यांनी यशस्वी पणे सांभाळली आहे.प्रथमच मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना इंदरपाल यांनी महाराष्ट्राच्या मातीतील कथानकाची निवड केली आहे. इथल्या लाल मातीच्या राजकारणातील बारकावे अभ्यासपूर्णशैलीत मांडत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा अचूक वेध घेतला आहे.राष्ट्र चा विषय खूपच वेगळा आणि वर्तमानातीव परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याने त्यांला न्याय देण्यासाठी दिग्गज कलाकारांची निवड केली जाणं ही कथानकाची गरज असल्याने मराठीतील नामवंत कलाकारांना निवडण्यात आल्याचं इंदरपाल सांगतात. विक्रम गोखले हे राष्ट्र मधील हुकूमी एक्का आहेत. विक्रम गोखले यांनी आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. या व्यक्तिरेथेसाठी विक्रम गोखले हेच आमची पहिली आणि शेवटची पसंती होती असं चित्रपटाचे निर्माते बंटी सिंग यांचे म्हणणे आहे. कथा ऐकताच विक्रम गोखले यांनी होकार दिल्याने कोणतीच अडचण आली नाही. मराठी चित्रपट सृष्टीतील हा सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट आहे. तो याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
आजवर बऱ्याच चित्रपटात राजकारण्याची भूमिका साकारणाऱ्या गोखले यांनी राष्ट्रमध्ये साकारलेली पुढारी सर्वार्थाने वेगळा आहे. वेशभूषेपासून अभिनयापर्यंत सर्वच पातळीवर हे व्यक्तिमत्त्व गोखले यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. निर्माते बंटी सिंग यांनी या चित्रपट महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. 
'राष्ट्र'मधील पुढाऱ्याची व्यक्तिरेखा आजवर साकारले ल्या राजकीय भूमिकांपेक्षा अतिशय भिन्न असल्या नेच आपण ती स्वीकारल्याचं विक्रम गोखले यांनी सांगितले.  मोहन जोशी, रोहिणी हट्टांगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नर्वेकर, दीपक शिर्के आणि गणेश यादव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल यांनी 'राष्ट्र'ला संगीत दिलं आहे.                     

Post a Comment

 
Top