Add

Add

0
       डॉ.अस्मिता वेले यांचे प्रतिपादन; 'केशायुर्वेद'तर्फे 
                  आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

पुणे(प्रतिनिधी):- "युरोपीय देशांसहित जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत" असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी केले.
भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडिया तर्फे सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयो जित आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी 'आंतरराष्ट्रीय स्तवरावर आयुर्वेद' या विषयावर डॉ. अस्मिता वेले बोलत होत्या. याप्रसंगी बुकगंगा इंटरनॅशनलचे संचालक मंदार जोगळेकर, केशा युर्वेदचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर, बीव्हीजीचे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, डॉ. अजित कोल्ह टकर, आयुर्वेदाचार्य डॉ. सुकुमार देशमुख,डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केशायुर्वेदचे जगभरात 50 उपकेंद्र झाल्याबद्दल केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
 डॉ. अस्मिता वेले म्हणाल्या, "वैद्यांनी प्रत्येक गोष्टीचा दस्तावेज ठेवला पाहिजे. आयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालयही त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशात आयुषमार्फत भारतीय दूतावासात आयुर्वेदाचे अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यामुळे परदेशात नव्याने आयुर्वेदात काम करू पाहणाऱ्यांना संधी आहेत. त्याचा फायदा भारतीय वैद्यांनी घेत आपल्या भारतीय आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला पाहिजे."
मंदार जोगळेकर म्हणाले, "इंटरनेटमुळे वैद्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सोशल मीडियासह इतर नवमाध्यमांचा आयुर्वेद प्रसारासाठी वापर केला पाहिजे. आपापसांतील संवाद वाढविण्यासाठी आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी 'वेबिनार'चा प्रभावी वापर केला पाहिजे." डॉ.हरीश पाटणकर म्हणाले, "केशा युर्वेद हे आयुर्वेदाला तत्रंज्ञानाची जोड देऊन विकसित केलेले संशोधन आहे. अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद आनंददायी असून, येत्या वर्षभरात शंभर उपकेंद्र सुरु करण्याचा मानस आहे. योगापाठोपाठ आता आयुर्वेदही जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रशियात योग आणि आयुर्वेदाला महत्व दिले जात असून, नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी सद्यस्थिती अनुकूल आहे."
"युरोप आणि जपान आता पर्यायी औषधे म्हणून आयुर्वेदाला स्वीकारत आहे. परंतु, पुराव्यांवर त्यांचा अधिक भर आहे. तुमच्याकडे ज्ञान, सादरीकरण, नाविन्यता आणि तेथील कायदेशीर बाबींची जाण असेल,तर चांग ल्या पद्धतीने तुम्ही आयुर्वेद रुजवू शकता," असे डॉ.सुकुमार देशमुख यांनी 'युरोप व जपानमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर बोलताना सांगितले. डॉ. अस्मा इनामदार 'दुबईमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. दुबई हे वैद्यकीय पर्यटन म्हणून विकसित होत असल्याचे त्या म्हणाल्या. 'जर्मनीमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. प्रियांका चोरगे म्हणाल्या, "जर्मन भाषा अवगत करण्यासाठी तेथील लोक आणि सरकार तुम्हाला मदत करते. त्यामुळे भाषेचा फारसा अडसर राहत नाही. विविध कोर्सेस आणि समुदेशन सत्रातून आपण आयुर्वेद पोहोचवू शकतो." डॉ. भावना उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्ताजी गायकवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top