Add

Add

0
देहूआळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे, पंढरपूर विकास आराखड्यांतर्गत
विकासासाठी 212 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

पुणे (प्रतिनिधी):- पुणे विभागातील देहूआळंदी व पंढरपूर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 1 हजार 94 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी 745 कोटी वितरित केले आहेत, त्यापैकी 711 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये वितरित केले जातील,यासर्व विकास कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
देहूआळंदीभंडारा डोंगर, सदुंबरे, पंढरपूर व पालखीतळ/मार्ग  विकास आराखड्यातील कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विकास आराखड्यातील कामांच्या सद्यस्थितीबाबत व भूसंपादन निधीच्या मागणीबाबत सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कामांचा आढावा घेवून कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
 या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटसाताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे,सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार बाळा भेगडे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीणसिंह परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर सचिव देवाशीष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
देहूआळंदीपंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सन 2014 पासून 1094 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून यामध्ये पुणे व सोलापूर परिसरात या विकास आराखड्यातील कामासाठी व पालखी मुक्कामाच्या कामासाठी जमीन संपादनाचे काम प्राधान्याने घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच पालखी मार्गावर शौचालयांची सुविधाचंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिर परिसर सुधारणानवीन बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रीटीकरणत्याचप्रमाणे वारीकाळात शौचालयांची सुविधा होण्यासाठी खासगी मठ व वाड्यामध्ये शौचालय बांधणेवाळवंट सुधारणा कार्यक्रमनामदेव स्मारक उभारणी, पंढरपूर ते पिराची कुरोली (जूना अकलूज पंढरपूर रस्ता) आदी कामांचा आढावा घेण्यात आला.
पुणे व सोलापूर परिसरात या विकास आराखड्याच्या कामासाठी जमीन संपादनाचे काम तातडीने करावे त्यासाठी 150 कोटी रुपये वितरित केले जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी देहू आळंदी परिसरात केली जाणारी कामेसदुंबरे विकास आराखडाभंडारा डोंगर विकास आराखड्यातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
*****                        

Post a Comment

 
Top