Add

Add

0

                       मिलिंद इंगळे – सौमित्र पुन्हा एकत्र

मुंबई (प्रतिनिधी):- तब्बल 20 वर्षांपूर्वी मराठी अल्बम ‘गारवा’ याने मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषिक युवकांनाही वेड लावले होते. गायक संगीतकार मिलिंद इंगळेच्या अल्बममधील सर्व गाणी सौमित्र म्हणजेच कवी-अभिनेता किशोर कदम यांनी शब्दबद्ध केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांसाठी नवाकोरं गाणं घेऊन आली आहेत. ‘तिला सांगा कुणी तरी’ हे गाणं नुकतंच यु ट्यूबवर रिलीज झाले असून काही दिवसातच या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘गारवा’ अल्बममधील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. या अल्बमचे
वैशिष्ट्य म्हणजे गाण्याच्या मध्येच सौमित्रच्या आवाजात ऐकू येणारे कवितांचे गद्यवाचन हे होते. त्यामुळे म्युझिकवर गाणं आणि कविता या दोन्हीचा आनंद प्रेक्षकांना घेता आला. एकंदर हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर दोघांनी ‘तुझ्या टपोरं डोळ्यात’ हे गाणं चाहत्यांसमोर आणलं. तसेच आता ‘तिला सांगा कुणी तरी’ हे गाणंही जोडी घेऊन आले आहेत. या गाण्याला स्वर आणि संगीतबध्द स्वतः मिलिंद इंगळे यांनी केले असून गाण्यांचे बोल हे सौमित्र यांचे आहेत. ‘दाटुनी आले, तिला सांगा कुणी, मन गर्भार झाले, तिला सांगा कुणी…’ असे या गाण्याचे बोल आहे. अभिनेत्री मीरा जोशी हिच्यावर हे गाणं चित्रित झालं असून मिलिंद स्वतः देखील या गाण्यात दिसत आहे.

Post a Comment

 
Top