Add

Add

0

जिल्ह्यातील मराठी शिक्षकांच्या कार्यशाळेत ' लोकराज्य शाळा ' करण्याचे आवाहन

पुणे(प्रतिनिधी ):-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य’ हे शासनाचे मुखपत्र दरमहा प्रकाशित करण्यात येते.शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार झाल्यास त्या शाळेला लोकराज्य शाळा'  म्हणून घोषित करण्यात येईललोकराज्य शाळा ही संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या शाळांच्या प्रतिनिधींचा मा.पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या अधिपत्याखालील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्य अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले.
पुणे जिल्हा अध्यापक संघ, मराठी अध्यापक पुणे शहर संघ व नूतन मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नूतन मराठी प्रशाळेतील या कार्यशाळेस माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी दिपक माळी, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, रंगनाथ सुंबे, संजय गवांडे, अशोक तटके,  हनुमंत कुबडे,  ज्ञानदेव दहिफळे आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग म्हणाले, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब या अंकात पाहायला मिळतेतसेच लोकराज्य हे मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेदर्जेदार मजकूरआकर्षक व सप्तरंगी अंक प्रकाशित होत असल्यामुळे या मासिकाचा खप चार लाखांवर आहेअंकातील सर्वच मजकूर वाचनीय व वैशिष्टयपूर्ण असतोत्याबरोबरच हा अंक विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी कसा उपयुक्त आहे याबाबत देखील त्यांनी  माहिती दिली. जिल्ह्यातील शिक्षकांनी 'लोकराज्य शाळा' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 020- 26121307 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक नवेश पाटील यांनी तर आभार प्रशाळेच्या उपमुख्याध्यापिका सरिता गोखले यांनी मानले.  कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शाळांच्या मराठी विषयांचे शिक्षक उपस्थित होते.Post a Comment

 
Top