Add

Add

0

33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2 डिसेंबरला

पुणे :(प्रतिनिधी):-देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची जननी असलेली 33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा यावर्षी 2 डिसेंबरला होणार आहे. ही स्पर्धा कै. बाबुराव सणस मैदान येथून सुरु होणार असल्याची माहिती पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्‍वस्त अभय छाजेड, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे आणि गुरुबन्स कौर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये तब्बल आठ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा महिलांची पुर्ण मॅरेथॉनचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्व. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रल्हाद सावंत स्मृति रन ही 3 किलोमीटरची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनमध्ये पुर्ण पुरुष मॅरेथॉन- 42 किलोमीटर, पुर्ण महिला मॅरेथॉन- 42 किलोमीटर, पुरुष आणि महिला अर्ध मॅरेथॉन-21 किलोमीटर,  पुरुष आणि महिला - 10 किलोमीटर, पुरुष आणि महिला -5 किलोमीटर आणि प्रल्हाद सावंत स्मृति रन 3 किलोमीटरच्या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. 
याव्यतिरिक्त शालेय पातळीवर मुलांकरिताही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट तयार करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा तसेच मॅरेथॉन पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरही संपर्क साधावा, असे आवाहन छाजेड यांनी केले आहे.
पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये कै. प्रल्हाद सावंत यांच्या निधनानंतर स्पर्धा संचालक म्हणून सुमंत वाईकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर तांत्रिक अधिकारी म्हणून बाप्टीस्ट डिसुझा यांची तर स्पर्धा सहसंचालक म्हणून रोहन मोरे आणि गुरुबंस कौर हे काम पाहणार आहेत. तसेच या स्पर्धेत रजिस्टर करण्यासाठी संकेतस्थळाबरोबरच मित्रमंडळ चौक येथील मॅरेथॉन भवन येथे ही संपर्क करण्याचे आवाहन छाजेड यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top