Add

Add

0
कर्तव्य दक्ष पोलिसांच्या भावना दुखवु नका त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा ! ! 
मुंबई (प्रतिनिधी):-महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे.  ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास बांधील आहेत.पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवली जात आहे.

 सार्वजनिक उत्सवात  होणाऱ्या अवर्णनीय गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस पथक , अन्य सेवा पथके ही ही नेहमीच अग्रेसर असून आपले कर्तव्य बजावत असतात  पण  दिवस रात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसाना सध्या खूप नामुष्की पत्करावी लागत आहे. सण , उत्सव म्हंटलं की बंदोबस्त हा आलाच  मग तो उत्सव कोणताही असो दहीहंडी , मोहरम , ईद , गणेश चतुर्थी , नवरात्र यांत प्रामुख्याने महत्वाची भूमिका असते ती पोलिसाची ,ज्याप्रमाणे घाण्याला जसा एखादा मजूर जुंपतो तसा पोलिस नामक सुरक्षा रक्षक दिवसरात्र डोळ्यात तेल घालून नागरिक सुरक्षेततीची हमीपुर्वक आपली भूमिका इमानेइतबारे बाजावत असतो,  ध्येय एकच की उत्सवाला कुठे  गालबोट लागू नये यासाठी तो प्रामाणिकपणे झटत असतो  पण या उत्सवकाळात मंडळाचे काही महाभाग विघ्नसंतोषी कार्यकर्ते असे असतात की ते उत्सवातील आनंदात विर्झन टाकण्याचा कुटील प्रयत्न करून उत्सवाला गालबोट लावण्याचा घाणेरडा प्रकार करतात शिवाय दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना सुद्धा उद्धट आणि असभ्यतेची वागणूक देतात. पुणे हे मराठी माणसाचे मराठी भाषेचे माहेर घर म्हणुन संबोधले जाते पण अशा या पुणे आणि नाशिक सारख्या विकसनशील भागात तर कार्यकर्त्यांचा कहर पहायला मिळतो सर्वोच्च न्यायालयाने डीजे डॉल्बी वर बंदी घातली असून देखील या महाभाग कार्यकर्त्यांनी आपल्या अमानुष कृत्याचे हवे ते प्रदर्शन मांडून कायद्याची नितिमुल्ये पायदळी तुडवली जात आहे, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे तेव्हा  यांत सभ्यता मानणाऱ्या कार्यकर्त्यांना कायद्याचा बडगा दाखविणे ही आता खरी काळाची गरज आहे पण कुंपणच जर शेत खात असेल तर काय करणार म्हणजेच काय तर आपलेच लोकप्रतिनिधी , नाकारे राज्यकर्ते, खासदार , आमदार हीच लोकं अशा बेजबाबदार कार्यकर्त्यांना पाठीशी घालून त्यांच्या हीन कृत्यांवर पांघरूण घालतात तेव्हा हे कुठे तरी थांबले पाहिजे त्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळी यांनी एकत्रित पणे पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे,  गणेश भक्तांची भाविकता लक्षात घेऊन त्यांना  सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे पण तसे न होता धक्काबुक्की , चेंगराचेंगरी इत्यादी अनुचित प्रकार घडताना दिसतात प्रसंगी भाविकांची लूटमार कुणाचे पाकीट मार  , कुणाचा मोबाईल चोर , कुणाचे दागिने लंपास कर तर कुणाची पर्स इत्यादी विक्रूत प्रकारांना उधाण येते  रांगेतील गणेश भाविक ही त्याला तितकेच जबाबदार आहेत कारण आज अंधश्रधा इतकी बोकाळली आहे की बाप्पा नवसाला पावतो  म्हणुन बाप्पांच्या दर्शनासाठी दहा ते बारा तास रांगेत उभे राहणाऱ्या  गणेश भक्तांना आपण नक्की कोणत्या शतकात वावरतो आहे याचेही भान नसते..आणि ह्या गोष्टी इतक्या सराईत पणे घडतात की पोलिसांना देखील याची अंमलबजावणी करणे कठीण जाते शिवाय त्यांनाच या गोष्टींत टार्गेट केलं जातं तेव्हा संपुर्ण हयात जनतेसाठी खर्ची घालणाऱ्या पोलिसांच्या पदरी निराशाच का ?  

जनतेच्या रक्षणासाठी अनेक संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या पोलिसांना ना कसल्या सुविधा, ना कसल्या सोयी, कठपुतली प्रमाणे राज्यकर्ते नाचवतील तसे नाचायचे, कधी वेळेवर पगार नाही , कधी वेळेवर जेवण नाही ,  कुटुंब सोबत कधी फिरणे नाही..   धार्मिक उत्सवात तर पोलिसांना खूप वाईट प्रसंगांशी सामना करावा लागतो  त्यात प्रामुख्याने श्री गणेश पाटपुजन , श्री गणेश आगमन , मौहरम , देवी उत्सव , दहीहंडी ,रास्ता रोको , आंदोलन , संप ,  मोर्चे , जातीय दंगली या माध्यमातुन कुठे काही अनुचित गैर प्रकार घडू नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत असतो इतक्या हाल अपेष्टा सोसून सुद्धा त्यांना समाजातून , उत्सव कार्यकर्त्यांकडून हीन दर्जाची वागणूक दिली जाते,पोलिसांना शिवीगाळ केली जाते  , त्याच्यावर हात उगारला जातो  , दादागिरी अरेरावी केली जाते आपल्या माता भगिनींची, आबालवृद्ध ची रक्षा करण्यासाठी उत्सव काळात  आपल्या जीवाची तमा न बाळगता चोवीस तास कर्तव्य तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या नावाने गळ ठोकली जाते 

आपण नुसते वर्षातील 8 ते 15 दिवस सामाजिक आणि सार्वजनिक उत्सवातील कार्यकर्ते म्हणुन मिरवतो पण वर्षातील 365 दिवस आपल्या साठी राबणाऱ्या पोलिसाला मात्र आपण तुच्छ लेखतो पोलिस जागा असतो म्हणुन आपण सुखाने झोपतो हेही आपण विसरतो. तेव्हा उत्सवातील कार्यकर्त्यांनी एक दिवस पोलिसी खाकी अंगावर चढवून पहावी आणि बंदोबस्तात ड्यूटी बजवावी म्हणजे कळेल की खाकी अंगावर चढवल्यावर किती महत्वाच्या जबाबदाऱ्या पाळाव्या लागतात , किती जणांच्या आदेशाचे पालन करावे लागते,कर्तव्य बजावताना किती संयम पाळावा लागतो ते, एवढीच जर कार्यकर्त्यामध्ये रग असेल तर त्याने खुशाल सीमेवर लढाईला जावे म्हणजे कळेल आपले भारतीय जवान आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर कोणत्या प्रकारे आपले जीवन व्यथित करत आहेत .पण " बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी" तेव्हा ह्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेरील असल्यामुळे त्या दुर्लक्ष केल्या जातात तेव्हा उत्सव प्रेमी कार्यकर्त्यांनी आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत करून कायदा हातात न घेता कायदा आणि सुव्यवस्था यांचे योग्य ते पालन करून पण आपल्या  महाराष्ट्रातील स्रुजाण नागरिक म्हणुन पोलिसांना सन्मानपूर्वक आदर देऊन त्याच्या कर्तव्याला सलाम करून त्याला मानाचे स्थान दिले पाहिजे.

Post a Comment

 
Top