Add

Add

0
शासकिय वसतिगृहांची पाहणी करून अहवाल सादर करावा
                                                               -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे (प्रतिनिधी ):-- जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची पाहणी करून अहवाल सादर करावा. अन्नाचा दर्जा. पाणी, शैक्षणिक सुविधा इ. बाबींची पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मागासवर्गीय वसतीगृह समन्वय समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, अशासकीय सदस्य बाळासाहेब खुणे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, वस्तिगृहांची तपासणी करण्यासाठी  समिती गठीत करण्यात यावी. या समितीने शासकिय वसतीगृहातील निवास व्यवस्था, भोजन, पाणी व्यवस्था, इतर शैक्षणिक सुविधांची पाहणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करावा. 
विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही तसेच गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. अशासकीस सदस्यांसोबत व्यक्तीश: वसतीगृहांची पाहणी व तपासणी करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
खाजगी इमारतीमध्ये कार्यान्वित असलेली शासकीय वसतीगृहे शासकीय जागेमध्ये कार्यान्वित करण्याबाबतचा जमीन उपलब्धतेच्या माहितीसह विस्तृत प्रस्ताव सादर करण्याचे र्निदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले. 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यामध्ये मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जागता यावे तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था, पुस्तके, वह्या, व इतर शैक्षणिक साहित्य इत्यादी सोयी सुविधा पुरविण्यात येतात.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांनी पुणे जिल्ह्यात 21 शासकीय वसतीगृहे असून त्यात मुलींची 9 व मुलांची 12 वसतीगृहे असल्याचे सांगितले.

Post a Comment

 
Top