Add

Add

0

          करा एन्जॉय; 2019 मध्ये ‘या’ आहेत मोठ्या सुट्ट्या...

कुटुंबियांसोबत एखादी मोठी ट्रीप प्लॅन करण्यापासून ते घरातील काही महत्वाची कामं पूर्ण करण्यासाठी, तुम्ही 2019 च्या लाँग वीकेंड्सचा वापर करु शकता.
हे वर्ष (2018) संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. कामाच्या आणि कुटुंबाच्या व्यापात अनेकांना हे वर्ष कसं गेलं, हे कदाचित कळलंही नसेल. कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात काहीजणांना ठरवूनही निवांत क्षण घालवता आले नसतील. मात्र, आता 2019 हे आगामी वर्ष तुमच्यासाठी भरपूर सुट्ट्या घेऊन आलं आहे. 2019 या संपूर्ण वर्षात सुमरे 10 ते 12 वीकेंड येणार आहेत. तसंच काही लाँग वीकेंड्सही पुढील वर्षात तुमची वाट पाहत आहे. या सुट्ट्यांना तुम्ही पर्यटनासाठी तुमच्या आवडत्या तसंच अन्य काही ठिकाणांना भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखादी छानशी ‘फॅमिली ट्रीप’ही प्लॅन करु शकता. त्याशिवाय तुम्ही घराची दागदुजी, घरातील रंगकाम अशी काही मोठी आणि महत्वाची कामं प्लॅन केली असतील तर, या सुट्ट्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करुन घेऊ शकता. 2019 मधील या सगळ्या सुट्ट्यांचा तुम्हाला पुरेपुर लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही योग्य नियोजन करणं मात्र आवश्यक आहे.एक नजर टाकूया, येणाऱ्या वर्षात कोणत्या महिन्यात आणि कोणत्या सुट्ट्या आल्या आहेत यावर…
जानेवारी..12 आणि 13 जानेवारीच्या वीकेंडला जोडून 14 जानेवारीला मकर संक्रांतीची सुट्टी आहे.त्यामुळे तुम्हाला जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात सलग 3 दिवस मिळणार आहेत. 
1 आणि 2 जूनला वीकेंड आहे तर 5 जूनला ईदची सुट्टी आहे. त्यामुळे 3 आणि 4 जूनची सुट्टी जर तुम्ही मिळवू शकलात, तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सलग 5 दिवसांसाठी बाहेरगावी जाऊ शकाल.
जुलै महिन्यातसुद्धा कोणतीही मोठी सुट्टी नाही.
ऑगस्ट ...
10 आणि 11 ऑगस्टमध्ये वीकेंड आहे आणि 12 ऑगस्टला बकरी ईदची सुट्टी. हे तीनही दिवस तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
त्यानंतर 15 ऑगस्टची सुट्टी आहे आणि 17 आणि 18 ऑगस्टला वीकेंड आहे. त्यामुळे सलग चार दिवसांची सुट्टी हवी असेल तर, तुम्ही 16 ऑगस्टची सुट्टी काढू शकता. 

सप्टेंबर 

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला वीकेंड आला आहे, तर 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. त्यामुळे हे सलग तीन दिवस तुम्ही हॉलीडे प्लॅन करु शकता. 

ऑक्टोबर

या महिन्यात सुट्ट्यांचा खजिना आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यानंतर 5 आणि 6 ला वीकेंड आहे. पुढे 7 ऑक्टोबरला राम नवमी आणि 8 ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी आहे. त्यामुळे 3 आणि 4 ऑक्टोबरची सुट्टी घेऊ शकलात, तर सलग 7 दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेऊ शकाल. परदेशातल्या एखाद्या ठिकाणाला भेट देण्यासाठीही एक आठवड्याची सुट्टी पुरेशी आहे. 

नोव्हेंबर 

9 आणि 10 नोव्हेंबरच्या वीकेंडला जोडून तुम्ही जर ११ तारखेची सुट्टी घेतलीत, तर 12 नोव्हेंबरची गुरुनानक जयंतीची सुट्टी घेऊन, तुम्ही सलग 4 दिवसं सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
डिसेंबर
21 आणि 22 डिसेंबरला वीकेंड आहे, तर 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी आहे. त्यामुळे 23,24 डिसेंबरची सुट्टी घेतलीत तर सलग 5 दिवसांची मोठी सुट्टी तुम्हाला एन्जॉय करता येईल.
त्यामुळे आता जराही वेळ न दवडता या सुट्ट्यांना तुम्ही काय करणार आहात? याचा प्लॅन करायला घ्या…

Post a Comment

 
Top