Add

Add

0

26 नोव्हेंबर 2008: मुंबई वाचविणसाठी.. नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम
                      नॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो
26 नोव्हेंबर 2008ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणी ऑपरे शन ब्लॅक टोरनॅडो करता नॅशनल सिक्युरिटी गार्डला (एनएसजी)  बोलवण्यात आले. एनएसजी दिल्लीवरून विमानाने 1163किलोमीटरचे अंतर पार करून 27 नोव्हेंबर 2008 ला सकाळी तीन वाजतामुंबईत पोहचले.कृतीदल; 51व 52 विशेष कृती गटां तून (51,52 Special Action Group)आलेल्या, भारतिय सैन्याच्या 195सैनिकांचे बनलेले होते.
सुरुवातीला दक्षिणमुंबईतील ताज पॅलेस आणि ओबेरॉय-त्रीडेंट यांना लक्ष् बनविण्यात आल्याचे लक्षात आले. मुंबई पोलिसांनी घटनेच्या सुरुवातीची दिलेलीमाहिती ही असमाधानकारक होती. नंतर नरिमन हाऊस या तिस-या ठिकाणीही दहशतवादी असल्याची खात्री झाली. त्यामुळे कार्यदलाला तीन गटात विभागण्यात आले.
नरीमन हाऊसच्या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांना पकडणसाठी ताज येथील दोन निशाणबाज तुकड्यांना नरीमन हाऊसला पाठविणत आले.व्यूहरचना धक्कादायककृतीद्वारे दहशतवाद्यांना निरस्त करण्याची होती.याकरता शिरकावाच्या आणि डावपेचात्मक हाताळणीच्या निरनिराळ्या पद्धतींचा वापर करण्यात आला.शॉकऍक्शनद्वारा विविध पद्धतींचा व व्यूहरचनांचा वापर दहशतवाद्यांना निष्फळ करण्यासाठी वापरणत आला. वरच्या मजल्यावरुन खाली उतरण्याचा अभिनव मार्ग अवलंबण्यात आला.छोट्या शस्त्रांनिशी जबरदस्त फ़ायर करुन दहशतवाद्यांना जागीच खिळवून टाकण्यात आले.प्रत्येकी पाच कमांडोच्या हीटटीम्स् होत्या.
ताज टॉवर्स आणि ताज पॅलेस हॉटेल येथील कारवाई
ताज पॅलेस हॉटेलच्या  प्रत्येक मजल्यावरील कॉरीडोअरची लांबी ही सरासरी 840 फुट आहे, हॉटेलची एकूण लांबी सरासरी 1.80किलोमीटर आहे.एकूण परिसर 49,1400 चौरस फुट होता.330 स्युट,प्रत्येकमध्ये 2-3खोल्या जनरेटर संयंत्रासिंहत,140अतिरिक्त खोल्या, इत्यादी.याप्रमाणे 17मजले होते.ताज टॉवर्स मध्ये 21मजल्यांवर एकूण323खोल्या होत्या.
कारवाईतील अडचणी
एका खोलीत जाणे आणि शोध घेणे याला कमीत कमी 4 ते 5 मिनीट लागतात. 500खोल्यांसाठी 33-40तास म्हणजे एकट्या ताज टॉवर्ससाठी 50-63तास लागले. इमारतीमध्ये फक्त 192एसएजी कमांडो कारवाई करत होते.कारवाईचा मोठा परिसर असल्याने पाहुणेआणि नागरिकांची सुरक्षा करणे अवघड होती. ताजच्या ग्रॅनाईट भींतीमुळे रॉकेट फायर निष्प्रभ होते त्यामुळे ते वापरण्यात आले नाही.एकच मार्ग होता, स्फ़ोटके वापरुन दारे तोडणे. मर्यादित हॉटेल कर्मचाऱ्यांची उपलब्धता, कॉरिडोअरमधील छोट्या खोल्यांचा वापर लपण्यासाठी करण्यात आला आहे का याची माहिती नव्हती. खोल्यांमधील प्रकाशाचा अभाव आणि आतील बाजूने पडदे टाकण्यात आले होते. हॉटेल निवासी घाबरले होते आणि दरवाजा वाजविल्यावर अथवा आवाज दिल्यावरही ते त्यांची ओळख सांगत नव्हते. काही निवासींनी खोलीच्या बाहेर येणे सुरू केल्यानंतर त्यांना दहशतवाद्यांनी गोळी झाडली होती. ही घटना वाऱ्यासारखी त्वरीत पसरली आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांना खोल्यांमध्येच राहण्याचा सल्ला दिला.
27नोव्हेंबरला 9.20वाजता एनएसजीने मारकोसकडून (एमएआरसीओएस) कार्य हाती घेतले आणि हॉटेलच्या मांडणीची योजना मिळवली. पहिल्यांदी ताज चेंबर्स व रेस्टॉरंट सुरक्षित करण्यात आले. ताज पॅलेसमध्ये तळमजला सुरक्षित करण्यात आला आणि कारवाईचा पाया तेथे स्थापन करण्यात आला. जिन्याने छतावर जाऊन वरून-खाली कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी ताज मध्ये असल्याचे निदर्शनास आले होते. मजले सुरक्षित करित असतांना पहिल्या मजल्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता. कॉरिडोअरच्या डाव्या कोपऱ्यातून दोन दहशतवादी गोळ्या झाडत होते. पहिल्या मजल्यावर जात असतांना एक एसएजी कमांडो जखमी झाला होता. त्याला मेजर संदीप उन्निकृष्णन यांनी तळमजल्यावर ओढत आणले आणि त्याच्या गटाला तेथेच थांबण्यास सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार करत स्वत: तेथील जबाबदारी घेतली होती. त्याक्षणी अनपेक्षितपणे पहिल्या मजल्याच्या कॉरीडोअरच्या उजव्या कोपऱ्यातून दोन दहशतवाद्यांनी गोळीबार करित मेंजर उन्निकृष्णनला जखमी केले होते. दहशतवाद्यांना मारतांना मेजर उन्नीकृष्णन जखमी झाले. ते पुढे या जखमांमुळेच मृत्यूमुखी पडले.
पहिल्या मजल्यावरील वसबी रेस्टॉरंटजवळ तीन दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. लाकडी गोलाकार पायऱ्या आणि ग्रॅनाईटच्या भींतीमुळे एनएसजीच्या गोळीपासून ते सेफ़ होते. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आयडीज् स्फोट घडवून आणला आणि त्याचा परिणाम म्हणून शॉक वेवज्निर्माण झाल्या. त्यामुळे एका दहशतवाद्याने खिडकीतून उडी घेतली आणि त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. उर्वरित दहशतवादी रेस्टॉरंटमध्ये मरण पावले.
ओबेरॉय-त्रीडेंट येथील ऑपरेशन
येथे 11 मजले, प्रत्येक मजल्यावर 33खोल्या,तीन पातळ्यावर एकमेकांना जोडलेले तीन कॉरीडोअर होते.
ताज हॉटेलप्रमाणे दहशतवादी संख्या कोणालाच माहिती नव्हती.26नोव्हेंबरच्या सुरुवाती ला त्यांनी पाहुण्यांवर गोळीबार केल्यानंतर ते खोलीमध्ये लपून बसले होते. ते आपली जागा बदलतांना आणि एखाद्या ठिकाणी गोळीबार झाल्यास ते गोळीबार करत होते. ते 1856 क्रमांकाच्या खोलीत लपून बसले होते. ती खोली मास्टर की वापरून उघडताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.एक दहशतवादी बाहेर पडून लिफ्टकडे जात असतांना कॉरिडोअरमध्ये मारण्यात आला आणि दुसरा बाथरुममध्ये लपून बसला. ओबेरॉय हॉटेल 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दहशतवाद्यांपासून सोडविण्यात यश मिळाले. सुरक्षिततेची प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेल 29नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हस्तांतरीत करण्यात आले.
नरिमन हाऊस येथील ऑपरेशन...
नरिमन हाऊस हे दाट लोकवस्तीच्या शेजारी दक्षिण मुंबईत स्थित आहे.यहूदींचा निवास असणाऱ्या क्षेत्रात रहाणार्‍यांना तसेच कोणालाही आतील मांडणी बाबत माहिती नव्हती. निशाणा धरलेली तुकडी(Snipers) नरिमन हाऊसच्या आसपास तैनात करण्यात आली आणि बांधकाम सुरू असणार्‍या एका इमारतीत कमांड बेस स्थापित करण्यात आला. ती जागा नरिमन हाऊसमधून होणार्‍या गोळीबाराचे निरीक्षण करण्यास योग्य होती. इमारतीतील दहशतवाद्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या व त्याचे तुकडे जमीनीवर विखुरले होते. त्यामुळे कमांडोज् त्यावरून जातांना काचेच्या तुकड्यांचा आवाज होत असल्याने त्या आवाजाने दहशतवादी सतर्क होऊन कमांडोजला लक्ष करत होते.
इमारतीला सर्व बाजूंनी लोखंडी ग्रील होते आणि आतून पडदे टाकण्यात आले होते. मजल्यांना जोडणार्‍या पायर्‍या दहशतवाद्यांनी स्फोट करून उडवून दिल्या होत्या. लहान बाळाला घेऊन निसटलेल्या एका नोकराणीने सांगितले की, शेजारच्या व्यापार्‍याच्या घरात दहशतवादी स्थलांतरीत झाले आहेत. एका महिलेसहित सहा दहशतवादी आत असल्याचा अंदाज बांधला होता. अशा मिश्र माहितीच्या आधारे, शेजारील इमारतींची परवानगी घेऊन 27/28नोव्हेंबर मधील रात्रीत कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
हमला करणारा गट 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15वाजता हेलिकॉप्टरने इमारतीवर उतरला व सहकार्य करणारा दुसरा गट इमारतीवरून होणार्‍या गोळीबाराचे निरीक्षण करत होता. तालीम करण्यास अजिबात वेळ नव्हता.पहिल्यांदी सहावा आणि पाचवा मजला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आला आणि आठ वाजता चौथ्या मजल्यावर दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्यात आला होता.
हा तोच क्षण होता, जेव्हा हवालदार गजेंद्र सिंगने खोलीचे समोरील दार तोडून खोलीत प्रवेश केल्यावर आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर आयइडीच्या सहाय्याने दुसरा प्रवेश मार्ग तयार करण्यात आला. समोरील दरवाज्याने आणि फोडलेल्या भींतींतून समन्वयाने गोळीबार करण्यात येत होता आणि कमांडोज्‌नी आतमध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांना निष्फळ केले.28नोव्हेंबर रोजी सायं काळी सहा वाजून 25 मिनीटांनी उद्देश सफल झाला.
आपण विसरता कामा नये...
एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले आणि तीन ठिकाणां वरील मिळून एकूण 610 बंधक/पाहुणे मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर 18जखमी झाले.
मेजर संदीप उन्निकृष्णन्,7बिहार,51एसएजी(मरणोत्तर)आणि हवालदारगजेंद्र सिंह , 10 पॅरा (एसफ),51एसएजी (मरणोत्तर) यांना देशांतील सर्वांत मोठे अशोक चकप्रदान करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडोसाठी 51आणि 52एनएसजीच्या विशेष कृती गटाला एक किर्तीचक्र, एक शौर्यचक्र, सहा सेना मेडल्स (वीरता), एक सेना मेडल्स (विशिष्ट्य) आणि एक सीओएएस स्थलसेनाध्यक्ष प्रशस्तिकार्डने गौरविण्यात आले.
                                                   ब्रिगे.हेमंत महाजन Post a Comment

 
Top