Add

Add

0

                  गोवर रुबेला लसीकरण मोहिम शुभारंभ...


पिंपरी(प्रतिनिधी ):- सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी गोवर  व रुबेला लसीकरण बालकांना करुन घ्यावे असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले.
भारत सरकारच्या  आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार संपुर्ण राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम 27 नोव्हेंबर 2018 पासून राबविणेत येत आहे त्याचा पिंपरी चिंचवड शहरातील शुभारंभ त्यांचे हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
साई जीवन प्राथमिक शाळा,जाधवाडी चिखली येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका अश्विनी जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, प्रशासन अधिकारी जोत्सना शिंदे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.सुनिता साळवे, लायन्स क्लब चे  डॉ.ललीत धोका, पंडित जाधव, गुलाब जाधव, मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड उपस्थीत होते.
या मोहिमेत शहरात सर्वप्रथम लसीकरण करुन घेणा-या जयश्री मोरे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मुले व मुलींचे भविष्याच्या आरोग्यासाठी गोवर रुबेला लस खुप महत्वाची आहे. भविष्यात येणा-या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गोवर रुबेला लस पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्वांनी घ्यावी असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.
            भारत देशामधन देवी,पोलिओ या आजारांना हद्दपार केले आहे त्यानुसारच गोवर रुबेला या आजारालाही भारत देशामधुन हद्दपार करण्यासाठी भारत सरकारने गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे नियोजन केलेले आहे असे ही ते म्हणाले.
या मोहिमेच्या उदघाटना दरम्यान महापौर राहुल जाधव यांचे कुटुंबातील बालकांनाही लसीकरण करण्यात आले यावेळी ते म्हणाले की, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरातील बालकांना लस देऊन करावी तसेच आपले नातेवाईक व शेजारी यांनाही या मोहिमेचे महत्व पटवून द्यावे.
            सार्वजनिक आरोग्यामध्ये गोवर लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसाठी लक्ष्य हे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालके/विद्यार्थी आहेत. 9 महिने ते 15वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त/अधिकतम बालक व विद्यार्थ्यां पर्यंत शाळांमधून पोहचणे सहज शक्य होणार आहे. राज्य शासनाचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड मनपा परीसरात दि.27 नोव्हेंबर 2018पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम सुरु करण्यात आलेली असून पाच आठवडे ती चालणार आहे.
            या मोहिमेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात करणेत येणार आहे. सदरचे लसीकरण महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून म.न.पा.शाळा, खाजगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्लेस्कुल इ. ठिकाणी मोफत करण्यात येणार आहे.
गोवर लसीकरण हा एक सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त उपाय उपलब्ध असताना देखील गोवर हे एक लहान मुलांमध्ये मृत्युचे प्रमुख कारण आहे. रुबेला हा सांसर्गिक, प्रामुख्याने सौम्य प्रकाराचा व्हायरल आजार आहे, जो मुलांमध्ये व प्रामुख्याने तरुण मुलींमध्ये आढळून येतो. रुबेला चे संसर्गामुळे गरोदर स्त्रीयांमध्ये गर्भाचा मृत्यु किंवा अर्भकास जन्मजात विकृती (आंधळेपणा, बहिरेपणा किंवा हृदयाचे विकार) असे आजार उदभवू शकतात यास कंजनायटल रुबेला सिंड्रोम (CRS) असे म्हणातात. जगभरात वर्षाला 1लाख बालकांमध्ये जन्मजात CRS आजार आढळून येतो. या आजाराकरिता विशिष्ठ उपचार पध्दती उपलब्ध नसुन फक्त रुबेला लसीकरणाव्दारे याला रोखु शकता येते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आण्णा बोदडे यांनी केले, प्रास्ताविक डॉ.वर्षा डांगे यांनी केले तर आभार डॉ.पवन साळवे यांनी मानले.

Post a Comment

 
Top