Add

Add

0
                 ढेपेवाड्यातील धम्माल मस्ती आणि चिंटू !!
पौड (प्रतिनिधी ):-मराठमोळ्या वाडा संस्कृतीतील पारंपारिक वातावरण, जुने खेळ, पाटावरील भोजन अशा वातावरणात चिमुकल्यांना एक नवं आजोळ सापडलं !निमित्त होते जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या 'ढेपेवाडा ' आयोजित 'चिंटू ' आणि वाडा संस्कृतीतील खेळ ! ' या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे !
'चिंटू ' चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित यांनी या सहलीतील सहभागी मुलामुलींना ,पालकांना 'चिंटू '' ची रेखाटने करून दाखवली .बालगोपाळांनी चिंटूचे चित्र रंगविण्याचा आनंद लुटला. कार्टून, अॅनिमेशन या प्रकाराची माहितीही चारुहास पंडित यांनी दिली.
'ढेपेवाडा ' चे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवले. त्यात लगोरी, सागरगोटे, भोवरा, सूर पारंब्या, सारीपाट, खांब खांब खांबोळी, गोटया, आंधळी कोशींबीर, भातुकली, आटया पाटया अशा अनेक पारंपारिक खेळांचा समावेश होता.
,वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची , जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली . मुदपाकखाना, उखळ, जातं, तुळशी वृंदावन, विहीर, घंगाळ,चौरंग, झोपाळा या विस्मृतीत चाललेल्या चीजा बघून बालगोपाळ हरखून गेले.
बालगोपाळांनी ढेपेवाडा महाद्वार, दिंडी दरवाजा, देवळी, देवघर, दिवाणखाना, मुद पाकखाना, न्हाणीघर , शयनघर, पलंग अशा जुन्या वास्तू वैशिष्टयांसह पाहिला.
'ढेपेवाडा ' हा मुळशीच्या कोळवण खोऱ्यात असून वाड्याची सर्व वास्तू वैशिष्टये येथे पाहावयास मिळतात जुनी संस्कृती जपण्यासाठी खास 'ढेपेवाडा ' बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा , जीवनशैलीचा आनंद देणारे महाराष्ट्रातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,अशी माहिती नितीन ढेपे यांनी दिली.
या उपक्रमातून नव्या पिढीला पूर्वीच्या एकत्रित कुटुंब पध्दती विषयी माहिती देण्यात आली आणि त्याचे महत्व नितीन ढेपे ह्यांनी सांगितले तसेच आपल्या पुरातन वास्तू व त्यातील राहणीमान जपले गेले पाहिजे असा संदेश देखील दिला

Post a Comment

 
Top