Add

Add

0
जगातील सर्वात मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाने दिली भेट
              नेपाळ मधील विविध विकास कार्याला डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्याकडून प्रेरणा

पुणे(प्रतिनिधी):-धार्मिक व जातीय संतुलन एकत्रित करण्यासाठी सदभावना व देशातील सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करण्यासाठी या अशा प्रकारच्या घुमटामुळे फार मोठा उपयोग होणार आहे. याचीच प्रेरणा घेऊन नेपाळमध्ये आम्ही पण अशा प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू. असे उद्गार नेपाळच्या प्रदेश एकचे शिक्षण व आरोग्य मंत्री, सांस्कृतीक, युवक कल्याण, सामाजिक न्याय महिला बाल कल्याण मंत्री जीवन घिमिरे यांनी काढले.
नेपाळ येथील सरकारी अधिकार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्ह र्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह व विश्‍व शांती ग्रंथालय याला भेट दिली. यावेळी कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र  पोखरेला बरोबर 8 सदस्यांचा समावेश होता. यामध्ये केबीए ऊर्जाचे एमडी दिपक छपगैरी, आयओसीचे मेंबर राजकुमार कोटले, कंकई वड्रो दोनचे परशूराम गिरे, येनोंगी मेंबर जीबन श्रेष्ठ, डमक एनपी टाक बहाद्दूर थापा व इंजिनियर पवन गिमेरिया यांचा समावेश होता.
जीवन घिमिरे म्हणाले, डॉ. कराड या एकाच व्यक्ती ने जे उभे केले ते त्यांचे मोठे योगदान आहे. याचे उदाहरण आम्ही घेतलेच पाहिजे.त्यांचे व्हिजन उत्तम होते. सदभाव,धार्मिक आणि सहिष्णुता यातून निर्माण होईल. नेपाळमध्ये एक मोठी नदी आहे. तेथे सर्व धर्मांसाठी एकत्रित असे स्फूर्तीस्थान उभे करण्याचा आमचा मानस आहे.
शेजारधर्म निभावताना डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी यापूर्वी काठमांडू नगरपलिका हद्दीत भूकंपग्रस्तांसाठी ज्ञानेश्‍वर, तुकाराम व विवेकानंद यांच्या नावाने  120 घरे बांधून दिली आहेत. तेथे आमचे राज्य सरकार काही विकासात्मक सुधारणा करणार आहे. त्या विकास कार्यासाठी प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड यांचे मोलाचे योगदान असावे.
कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला म्हणाले, डॉ. कराडांची दुरदृष्टी एकमेवाद्वितीय आहे. त्यांना देवाने एक विलक्षण शक्ती दिली आहे. म्हणूनच त्यांनी जगातले हे आठवे आश्‍चर्य उभे केले आहे. मानवता ही वास्तविक सर्वात मोठी गोष्ट आहे. मानवतेची सेवा हे सर्वात मोठे कार्य आहे. या अद्वितीय घुमटाच्या माध्यमातूत सर्व धर्म समभाव व मानवतेचा संदेश जगाला दिला जाईल.
तसेच, त्यांनी डॉ. कराड यांना विनंती केली की नेपाळ येथे उच्च तंत्रशिक्षण विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी योग्य ते सहकार्य करावे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या प्रसंगी शिष्टमंडळाला विश्‍वशांती केंद्राचे सल्लागार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी विश्‍वशांती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच, मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पाडे यांनी डोम संदर्भातील विस्तृत माहिती दिली. यावेळी पर्यावरण शांती सूरज गायकवाड , राजेंद्र रणभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top