Add

Add

0
ग्लोबल चिपळूण टूरिझमचा बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी” महोत्सव सुरु   

           ‘डेस्टीनेशन चिपळूण-पॉकेट साईझ झेडकार्ड’चे प्रकाशन ;
            विविध कार्यक्रमाची रेलचेल ; बुधवारी समारोप होणार
चिपळूण(धीरज वाटेकर):- कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीच्या तीरावरशहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशीगोवळकोट धक्का परिसरात ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ आयोजित चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी” महोत्सवाचे उद्घाटन आणि डेस्टीनेशन चिपळूण-पॉकेट साईझ झेडकार्डचे प्रकाशन काल (शनिवार) गोवळकोट धक्का येथे चिपळूणचे पोलीस निरीक्षक जनार्दन पोळ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, आर.डी.सी.सी.चे मॅनेजर महाडिक यांच्या हस्ते उत्साहात झाले.
यावेळी परशुराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, सावंत, पेढे उपसरपंच मेघना सुर्वे, चित्रा गमरे, राम पडवेकर, लिनता दिवटे, अंजली जमदाडे, माधवी दिवटे, माजी सरपंच जनार्दन मालवणकर, मीरा पाकळे, मयुर पाकळे, सरपंच गजानन कदम, उपसरपंच श्रीमती काजवे,  ग्लोबल चिपळूण चे अध्यक्ष श्रीराम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहीम दलवाई, सचिव संजीव अणेराव, शाहनवाज शाह, रमण डांगे, राजा पाथरे, मिलिंद कापडी, समीर कोवळे, निलेश बापट, सज्जाद काद्री, महेंद्र कसेकर, सौ. प्रेरणा लाड, व्यवस्थापक विश्वास पाटील, डेस्टीनेशन चिपळूण-पॉकेट साईझ झेडकार्डचे लेखक-संपादक धीरज वाटेकर, विलास महाडिक उपस्थित होते. यावेळी बोलताना चिपळूणचे पोलीस निरीक्षक जनार्दन पोळ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी ग्लोबल चिपळूण टुरिझम च्या चिपळूण पर्यटन वाढीसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.  डेस्टीनेशन चिपळूण-पॉकेट साईझ झेडकार्ड’चा उपयोग पर्यटन वाढीसाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सवतसडा येथील रॅपलिंगव्हॅली क्रॉसिंग उद्घाटनादरम्यान अभय सहस्रबुद्धे यांनी सवतसडा विकासकामांसंदर्भात माहिती दिली. निलेश बापट यांनी ग्रामीण पर्यटनात सवतसडा परिसराचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत माहिती दिली. जिद्दी माउंटेनिअरिंगच्या धीरज पाटकर यांनी साहसी पर्यटन संदर्भात माहिती दिली. या दरम्यान एसआर जंगल रिसोर्ट धामणवणे येथेही विविध साहसी क्रीडा प्रकारांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि बोट सफर दरम्यान चिपळूण बॅकवॉटर संदर्भात धीरज वाटेकर यांनी मान्यवरांना माहिती दिली.
 क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा संपूर्ण महाराष्ट्रातील हा एकमेव उपक्रम असून या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटन समृद्धीचा सुगंध सर्वदूर पसरावा हा उद्देश आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभवइथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे,गड-किल्लेप्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्ठी खाडीतिच्यातील छोटी-मोठी बेटेसह्याद्रीच्या पर्वत रांगाकोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावाअशी व्यवस्था या निमित्ताने करण्यात येणार आहे. सध्या रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सवतसडा धबधबा येथे रॅपलिंगव्हॅली क्रॉसिंगसह धामणवणे येथील एसआर जंगल रिसॉर्ट येथे पॅरालल रोपरोप बॅलन्सिंगरायफेल शूटिंगसॅक लाईन,ट्रेझर हंट आदि विविध साहसी क्रीडा प्रकार कार्यरत असणार आहेत. जिद्दी माउंटेनिअरिंगचे 12 सदस्य या विषयात कार्यरत आहेत. 6 सुशोभित नौकांच्या माध्यमातून जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारीखाडीकिनारी निवांत वाळूत पहुडलेल्या मगरींचे दर्शनविविध जलचर आणि पक्ष्यांचे दर्शन घडविण्यात येत आहे. पर्यटकांना चिपळूण पर्यटन दर्शन आणि किल्ले गोविंदगडालाही भेट देता येईल. 
दिनांक 25 रोजी सायंकाळी 5.30 वा. दैनिक सागर रंगमंच जुना भैरी मंदिरानजिक महोत्सवाचा समारोप आणि यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहोळा आणि ‘सन्मान माझ्या मातीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दिनांक 26 रोजी आणि त्यानंतरही क्रोकोडाईल सफारी सुरु राहणार आहे. त्यानंतरही पुर्वसुचना देऊन पर्यटकांना बोटिंगचा लाभ घेता येईल. पर्यटनप्रेमींनी चिपळूणातील या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवास उपस्थित राहून आपला नववर्षाचा आनंद द्विगुणीत करावाअसे आवाहन ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विश्वास पाटील मो. 982313524, 7057434319येथे संपर्क साधावाअसे आवाहन अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top