Add

Add

0

     दूध संस्थांनी ऑनलाईन माहिती भरताच अनुदान'

पुणे (प्रतिनिधी) :-राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना गाईच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयांचे अनुदान दिले जात आहे. याबाबत शेतकर्‍यांना रक्कम दिल्याबाबतची आवश्यक असलेली ऑनलाईन माहिती सहकारी व खाजगी दूध संस्थांनी देणे आवश्यक आहे. ती भरताच तात्काळ अनुदान रक्कम वितरित केली जात आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतकर्‍यांचे हित पाहून दूध संघांनी योजनेस सहकार्य करण्याचे आवाहन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. दुधाच्या  अनुदानासाठी सरकारकडे 306 कोटी रुपये उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.  

पुण्यात गुरुवारी (दि.6) सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध संस्थांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये सरकार कडून दूध अनुदान थकित राहिल्यावर चर्चा झाली. दुध खरेदी प्रति लिटरला 25 रुपये दराने करुन शेतकर्‍यांना 20 रुपयांप्रमाणेच रक्कम देण्याचा आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान मिळाल्यानंतर ते  शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय झाला. कारण 10 सप्टेंबरपर्यंतच दूधाचे अनुदान मिळाले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर संपर्क साधला असता ‘पुढारी’शी बोलताना जानकरांनी त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर निश्‍चित झाला. योजनेत प्रत्यक्ष हा दर शेतकर्‍यांना दिल्याबाबतची माहिती दूध संस्थांनी ऑनलाईनद्वारे भरण्याचे बंधन आहे. ज्या ज्या सहकारी दूध संघांनी आणि खाजगी दूध संस्थांनी ऑनलाईनवर माहिती भरलेली आहे, त्यांचे अनुदान माहिती तपासून तत्काळ वितरित करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम दिली जाणारच आहे. त्यामुळे सर्वांनी पुर्वीप्रमाणेच योजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुधाच्या पॉलिथीन पिशव्यांसाठी सूट दयावी... 
पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक उत्पादकांवर पॉलिथीन पिशव्यांच्या पुनर्संकलनची जबाबदारी टाकली असून ती शक्य नसल्याने त्यांनी 15 डिसेंबरपासून उत्पादन थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे दुधाचे पॅकिंग अडचणीत आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पत्र लिहिले आहे. पर्यावरण विभागाने दुधासाठी काही दिवसांसाठी सूट देण्याची मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top