Add

Add

0
ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या बालचित्रकला स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद

साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग; डोळ्यांवर पट्टी बांधून चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक   

            चिपळूण(प्रतिनिधी):- येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. या संस्थेच्या दिनांक 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या बॅकवॉटर फेस्टिवल अॅन्डं क्रोकोडाईल सफारीच्या निमि त्ताने सकाळी शहरातील साने गुरुजी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या बालचिञकला स्पर्धांना शहरातील विविध शाळांती साडेतीनशे मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. मिड्ब्रेन अॅक्टीवेशन या संकल्पनेच्या आधारे डोळ्यांवर पट्टी बांधून अफलातून चित्रे काढणाऱ्या रायझिंग अॅकडमी या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे उपस्थित सर्व मान्यवर, पालक-शिक्षकांनी मनापासून कौतुक केले. स्पर्धा संपेपर्यंत हे सर्व वीस विद्यार्थी उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते.  
            या बालचित्रकला स्पर्धा गट पहिला- लहान / मोठा शिशुगटगट दुसरा– इयत्ता 1 ते 4गट तिसरा – इयत्ता 5 ते 7गट चौथा– इयत्ता 8 ते 10 आदि चार गटात पार पडल्या.स्पर्धक विद्यार्थ्यांना स्पर्धास्थळी कागद आणि स्पर्धेचा विषय देण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास तहसीलदार जीवन देसाई,ज्येष्ठ चित्रकार रवींद्र धुरी, रायझिंग अॅकडमीचे राजेश भांदिगरे, ग्लोबल चिपळूण टुरिझम अध्यक्ष श्रीराम रेडीज उपस्थित होते. देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे घोषित करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.यावेळी युनायटेड हायस्कूल, सती हायस्कूल, मिरजोळी नॅशनल स्कूल, बांदल स्कूल, यश इंग्लिश अॅकडमी, गद्रे स्कूल, पाग झरी शाळा, खतिजा स्कूल, रिक्तोली शाळा, जि.प. उक्ताड शाळा आदि विविध शाळांनी सहभाग घेतला. उदय मांडे, रेडीज सर, प्रेरणा लाड, मनीषा भांदिगरे, प्रल्हाद लाड, धोंडीराम शिंदे, विलास महाडिक, वणवे सर, श्रीमती मोरे, यादव, आखाडे,मिरगल आदी शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्लोबल चिपळूण टुरिझमचे मॅनेजर विश्वास पाटील, आर्कीटेक्त शाहनवाज शाह, डिझायनर महेंद्र कासेकर, पर्यटनदूत समीर कोवळे, आत्माराम कासेकर, अभय पांचाळ, प्रणाली आंबडसकर, शितल पिसे, संपदा बाईत यांनी परिश्रम घेतले.
            या सर्व तालुकास्तरीय स्पर्धांचा निकाल 20 डिसेंबरच्या दरम्यान स्थानिक वृत्तपत्रात जाहीर केला जाईल. प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांकाना मानचिन्हप्रमाणपत्रतसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. स्पर्धांतील विजेत्यांना संस्थेच्या बॅकवॉटर फेस्टिवल अॅन्ड क्रोकोडाईल सफारी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात 25डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सन्मानित केले जाईल. तसेच रंगभरण,निबंध आणि फोटोग्राफी स्पर्धांच्या अधिक माहितीसाठीविश्वास पाटीलमो. 9823 138524, 7057434319येथे संपर्क साधावा. या सर्व स्पर्धांत चिपळूण परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावेअसे आवाहन अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top