Add

Add

0
 संसारात राहुनही परमेश्‍वराजवळ जाता येते...
आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहात ह.भ.प.श्री. सुमंत महाराज नलावडे यांचे प्रवचन

पुणे(प्रतिनिधी):-“भक्ती करण्यासाठी डोंगरात किंवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. संसार चांगला केला तर आपल्याला भक्ती व नामस्मरणाच्या मार्गाने परमेश्‍वराजवळ जाता येते.”असे विचार भागवताचार्य शिवनेरभूषण ह.भ.प.श्री. सुमंत महाराज नलावडे यांनी मांडले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे तिसरे  पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
या प्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, सौ.उर्मिला विश्‍वनाथ कराड, नागपू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण,पं. उध्दवबापू आपेगावकर, ह.भ.प.श्री. नारायण महाराज उत्तरेश्‍वर पिंपरीकर,बाळासाहेब रावडे, गणपतराव कुर्‍हाडे-पाटील, विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, कार्यकारी संचालिका ज्योती कराड-ढाकणे आणि ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर हे उपस्थित होते. 
ह.भ.प.श्री. सुमंत महाराज नलावडे म्हणाले,“ तुकाराम महाराज यांनी चांगला संसार केला आणि त्यातून त्यांनी भक्तीच्या मार्गाने पांडुरंगाला आपलेसे केले.गृहस्थाश्रमात राहून आपले कर्म व्यवस्थितपणे पाळणे गरजेचे आहे. गृहस्थाश्रमात स्वामी सेवा,गुरू भक्ती, पितृ धर्म आणि पतीची सेवा यासारख्या सेवेला फार महत्व आहे. स्वामी सेवा म्हणजे ईश्‍वराची सेवा, नामस्मरणाच्या माध्यमातून तन, मन व धनाने केल्यास आपल्याला ईश्‍वर प्राप्ती होऊ शकते.गोरक्षनाथ व एकलव्यासारख्या शिष्यांनी गुरूची सेवा केली त्याप्रमाणे गुरू भक्ती आपण केली पाहिजे. आपल्या आई-वडिलांची सेवा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करून वागल्यास आपल्याला परमेश्‍वराचा जवळ जाता येत. पतीव्रतेला देवही घाबरतो त्यामुळे महिलांनी पतीची सेवा ही ईश्‍वर सेवा समजून जीवन व्यतीत करावे.”
“ संसारात सदैव सत्य बोलणे, दुसर्‍याला दुखः देऊ नये आणि संतानी सांगितलेल्या गोष्टीच्या आचरणाचे पालन केल्यास नक्कीच पांडुरंगाचा मार्ग प्राप्त होईल.”
यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य बालयोगी ह.भ.प.श्री. हरिहर महाराज दिवेगांवकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर विश्‍व शांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी अभंगवाणी कार्यक्रम सादर केला.श्री.शालीग्राम खंदारे यांनी प्रास्ताविक केले. श्री. महेश महाराज नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. 

Post a Comment

 
Top