Add

Add

0
‘वाशिष्ठी सफर: उगम ते संगम’ या राज्याच्या शैक्षणिक इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सांगता  


     चिपळूण(धीरज वाटेकर ):-येथील मिरजोळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दलवाई हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने योजिलेल्या अत्यंत महत्त्वकांक्षी वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचीदि. 9 रोजी  सायंकाळी सांगता झाली.विद्यार्थ्यांनी जग प्रसिद्ध दाभोळ खाडीचा प्रवास अनुभवत त्यातील निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, सामाजिक स्थिती, लोकांचे जीवनमान समजून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दरम्यान शालेय स्तरावर शिक्षण घेणाऱ्या 66विद्यार्थ्यांना एकाचवेळी, त्यांचे पोषण करणाऱ्या नदीची ‘उगम ते संगम’ अशी अभ्यासपूर्ण सफर यशस्वी होणारा, संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक इतिहासातील हा आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण पहिला उपक्रम ठरू पाहतो आहे. मानस संस्थामुंबई आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमाची संकल्पना मानसच्या कार्याध्यक्षा शमा दलवाई यांची तर पर्यटन अभ्यासकवाशिष्ठी नदीच्या उगमाचे शोधकर्ते धीरज वाटेकर हे या उपक्रमाचे समन्वयक होते.

      विद्यार्थ्यांनी केरळच्या बॅकवॉटरचा आनंदरम्यखाडीसंथपाणीटिपिकल किनारवर्ती गावंकिनाऱ्याला बिलगलेले डोंगरमध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटंत्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंबविविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि रम्य प्राचीनता वाशिष्ठीमध्ये अनुभवली. गत महिन्यात दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांनी वाशिष्ठी उगमाचा ट्रेक यशस्वी केला होता. २५ नोव्हेंबर रोजी करंबवणे ते मालदोली असा पहिल्या टप्यातील बोट प्रवास करण्यात आला. यावेळी मालदोली धक्का येथील संदेश आणि शैलेश संसारे बंधूंच्या ‘कोकण हेरिटेज’ प्रकल्पावर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खा. हुसेन दलवाई शमा दलशाई, विजया चौहान, सुमती जांभेकर, शीला मुखर्जी, इला दलवाई-कांबळी उपस्थित होत्या. संदेश संसारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांनी सह्याद्रीतील वन्यजीवन याबाबत माहिती दिली.दुसरे सर्वात मोठे राज्य फुलपाखरु ब्ल्यू मॉर्मन,कायम जागे राहत न झोपणारे जंगल,पानांवर मीठ जमा करणारी, लाटांचा वेग कमी करणारी, नैसर्गिक समतोलासाठी आवश्यक खारफुटी,जंगलात प्राण्यांना खारे पाणी मिळावे म्हणूनची चिखल किंवा चाटण युक्त जागा, मीठाचे खडे,मातीतील क्षार,दांडेलीतील 800-850 वर्ष जुना बकुळ, 23 हजार 500 किमी. अन्नासाठी प्रवास करणारा पक्षी बारटेल गॉडविल यांची माहिती त्यांनी दिली. संदेश संसारे यांनी खाडी किनाऱ्यावरील आपल्या पाच पिढ्यांच्या व्यवसाय आणि परिसरातील इतिहासाची माहिती दिली. सन 1978 पासून या खाडीत मगरी दिसत असून, शासनाच्या सर्व्हेत फक्त तीन मगरी दिसत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोटे सीईटीपीचे पाणी शुद्ध करून समुद्रात सोडण्यासाठीची 25 कोटी रूपये अंदाजपत्रक असलेली नवी पाईपलाईन मंजूर झाल्याची माहिती यावेळी खा. दलवाई यांनी पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांना विचारून घेऊन सर्वांना दिली. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक धीरज वाटेकर यांनी केले.

      संगम उपक्रमाचा दुसरा टप्पा दि.9 अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी करंबवणे-चिवेली-भडवळे-पांगरी हवेली-भारती शिपयार्ड-दाभोळ बंदर असा बोट प्रवास करण्यात आला. दिवसभरात विद्यार्थ्यांनी किरणा व्यावसायिक श्रीकांत लाड (करंबवणे), रामचंद्र शिवराम पावसकर, सखाराम मिंढे (भडवळे-भोईवाडी), माजी सरपंच इक़्बाल शरसुद्दिन दळवी,81 वर्षांचे हमदा शेख अहमद गोलंदाज यांच्यासह हासन शेख अहमद गोलंदाज, शौकत गोलंदाज, अब्दुल लतीफ अब्दुल्ला गोलंदाज (पांगारी-हवेली) यांच्याशी संवाद साधला. करंबवणे धक्यासमोर वाशिष्ठी आणि जगबुडी नद्यांचा संगम होतो. पाळंदे गावाच्या पुढे दापोली तालुका हद्द सुरु होते. पूर्वी खाडीत बेंगलोर, कारवार दक्षिणेतून मोठ्या शिडाच्या बोटी, गलबतं, तुतुकडी, मंजी येतं असतं. तुतुकडी हे दक्षिणेतील गावाचे एक नाव, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण बोटींना आपल्याकडे गावाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. जवळपास सर्वच खाड्यांचे काठ भरलेले असायचे. पूर्वी खाडीत दाभोळ ते गोवळकोट-चिपळूण या मार्गावर मीरा, अन्तुनी तर मुंबई दाभोळ मार्गावर रोहिदास, चंपावती या बोटी चालायच्या. त्याकाळी मुंबई ते दाभोळ हे तिकीट सात रुपये होते. पांगारी धक्क्यावर फार पूर्वीपासून मोठी हवेलीची इमारत होती, म्हणून ती पांगारी हवेली बनली.या भागात हरीक नावाच्या जातीच्या भाताचे पिक घेतले जायचे. वाल, पावटाकुळीथ यांची शेती व्हायची. एक रुपयात सोळा लोक त्यावेळी चहा प्यायचे. दिनांक 9 मे 1997रोजी लोटे येथील रासायनिक प्रकल्पातून पहिल्यांदा खाडीत दूषित पाणी सोडले गेले. खाडीतील लोकांना ती तारीख आजही चांगली लक्षात आहे. वरिष्ठांनी, प्रशासनाने लक्ष न दिल्याने प्रदूषणाचा फटका मोठ्या प्रमाणावर मासेमारीला, आंब्याला बसला. आंबा बागायतीवरही परिणाम झाला. पूर्वी तांबोशी, बोयर, मांगण, कोळंबी, रेणवी, रावस, पालू, कालचेडू, काळे खेकडे, आणि विषारी काट्याची बाण, शिंगटी, वागळं मिळायची. बारा महिने मासेमारी चालायची. अलीकडच्या सततच्या स्थानिकांच्या प्रयत्नाने कारखान्याचे दूषित पाणी खात्रीशीर प्रक्रिया करून सोडले तर थोडेसे मासे मिळतात, सध्या मिळताहेत. परंतु एकदा का दूषित पाणी खाडीत मिसळले की पुढे किमान महिनाभर मासेमारीवर त्याचा प्रभाव जाणवतो. खाडीतील जवळपास निम्मीअधिक लोकं शहरात गेलीत. किनाऱ्यावरची गावे रिकामी झालीत. बहिरवलीत अवघ्या दहा-पंधरा चुली पेटत असाव्यात. दाभोळहून चिपळूण-गोवळकोट पर्यंत पूर्वी बोट चालयची. पाच वर्षांपर्यंत खाडीत बोट चालू होती. करंबवणे भागात खाडी आज किमान साठ फूट खोल असावी. या भागात आता बहिरवली ते करंबवणे पूल मंजूर झालाय. खाडीतील लोकांच्या पुढच्या पिढी बोटीत कार्यरत नाहीत. पूर्वी वैदू लोकांवर ग्रामस्थांचा विश्वास असायचा. करंबवणे ते चिपळूण असे बरेचसे गावागावातून मुख्य ठिकाणी चालत जात. गावाच्या शाळेत सातवीपर्यंत धिप्पाड मोठी मुले असायची. खेमराज ग्रामदैवत असलेल्या करंबवणे-बिवली या दोन गावांचा एकच शिमगा होतो. गावाच्या जंगलात सहाणेजवळ देवराई आहे. हे स्थान उघड्यावर आहेत. पूर्वी येथील बंदरावरील 54एकर जागा टाटा कंपनीने घेतली होती. त्या जागेत 35 वर्षांपूर्वी त्यांनी एक दा चहापत्तीचे उत्पन्न घेतले होते. त्याकरिता मशिनरी आणली होती. सध्या ही जमीन हिंदुस्थान लिव्हर कंपनी असल्याची माहिती मिळाली. खाडीत पूर्वी दालदी समाज डोल (जाळी) लावायचा. वाण, पाग, तंबोस नावाचे जाळे मासेमारीसाठी वापरले जायचे. अशी माहिती विद्यार्थ्यांना संवादातून प्राप्त झाली.

  बंदरावर विद्यार्थ्यांनी माशांचा व्यापार आणि इतिहासप्रसिद्ध मॉंसाहेबांची मशीद पाहिली. दाभोळमधील जुन्या वास्तूंमध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेली, एवढी भव्यदेखणी मशीद कोकणपट्टीत दुसरी नाही. विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. प्रशस्त दगडी पायऱ्या, जोत्याच्या पोटातील खोल्यांची रचना, मशिदीसमोर मोठया चौथ-याच्या मधोमध असलेले कारंजे याबाबत सांगण्यात आले. विजापूरची राजकन्या आयेषाबिबी (माँसाहेब) सन 1659 मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली होती. हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही.घोडेस्वार,फार मोठा लवाजमा, लाखो रूपयांची संपत्ती होती.प्रवास रद्द झाल्यावर काय करावे ? अशा विचारात असताना मौलवींनी सोबतचे धन धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची सूचना केली. तेव्हा या मशिदीचे काम हाती घेऊन चार वर्षात पूर्ण केले गेले. कामीलखान नावाच्या शिल्पकाराने ही मशीद बांधली. याला अंडा मशीद असेही म्हणतात. अशी माहिती धीरज वाटेकर यांनी सांगितली. यानंतर सूर्यास्तसमयी सायंकाळी दाभोळच्या बंदरावर या उक्रमाचा समारोप झाला. यावेळी पहिल्यांदाच बोटीतून एवढा प्रवास केलेल्या श्रीया कांबळी, स्नेहा कदम, कौशल वरपे या विद्यार्थ्यांनी शिक्षिका संध्या बोराटे, शिक्षक रोहित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विकासाचा असमतोल, उगमाकडचे छोटेसे पात्र पुढे मोठे कसे झाले याची अनुभूती या उपक्रमातून विद्यार्थांना घेता आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. समारोप प्रसंगी मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक यांनी संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व संस्थाचालक, शिक्षक, ग्लोबल चिपळूण टुरिझम, मानस संस्थेचे सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून दाभोळच्या इतिहासाविषयी धीरज वाटेकर यांनी माहिती दिली. प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीनकाळी दालभ्यवती, महिकावती, हामजाबाद, मैमुनाबाद नावाने ओळखली गेली. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता.19व्या शतका्पर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता असे वाटेकर यांनी सांगितले. या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका मिरजोळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी समृद्ध जीवनानुभव ठरल्याची भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.

      हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानस संस्थेच्या चिपळूणच्या कार्याध्यक्षा सुमती जांभेकरशाळा समिती अध्यक्ष खालिद दलवाई,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पवारउपाध्यक्ष प्रकाश खेडेकरमुख्याध्यापक रामचंद्र महाडिकसर्व संस्थाचालकशिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह उपक्रमाचे संयोजक ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीजव्यवस्थापक विश्वास पाटीलनामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापटसदफ कडवेकरराणी प्रभुलकरविक्रांत प्रभुलकरविलास महाडिक यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

 
Top