Add

Add

0
संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 
( बडोदा, गुजरात जवळ )
आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी नर्मदामैय्याची एक उत्कट अनुभूती...
पायी चालणे – फक्त 18 कि.मी रिक्षा / वाहनाने सुद्धा करता येते.

पुणे (प्रतिनिधी):-नर्मदा परिक्रमा हे प्रत्येक भाविकाचे स्वप्न आहे. नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही आपण रोमांचित होतो. अशा वेळी तिचा प्रत्यक्ष सहवास घडविणारी ही परिक्रमा आपल्या जीवनाला जणू एका अदभुत अनुभूतीचा परीस स्पर्श करून जाईल. गंगा आणि नर्मदा या दोनच नद्या त्यांच्या प्रवाहमार्गामध्ये उत्तरवाहिनी बनून वाहतात. त्या जिथे उत्तरवाहिनी बनून वाहतात ते ठिकाण अतिशय पवित्र आणि मोक्षदायी असते अशी श्रद्धा आहे. गंगा काशीमध्ये उत्तरवाहिनी आहे आणि नर्मदा मंगरोल– रामपुरा – तिलकवाडा – गुजरात येथे उत्तरवाहिनी आहे.

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे. ही परिक्रमा रामपूरा–मंगरोल – तिलकवाडा या दरम्यान नर्मदा किनाऱ्यावर करता येते. एकूण जाता- येता 18 कि. मी. चा प्रवास आहे. संपूर्ण परिक्रमा पायी करावी लागते. ज्यांना चालणे शक्य नाही त्यांना रिक्षा किंवा वाहनानेही परिक्रमा पूर्ण करता येते.सकाळी सुरू केलेली परिक्रमा संध्याकाळी संपते.आदल्या दिवशी नर्मदा पूजन करून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा संकल्प करावा लागतो. त्यानंतर कन्यापूजनही करता येते. परिक्रमा संपल्यावर कढई करून भंडारा करता येतो. नर्मदा परिक्रमेचे महात्म्य आणि पुण्य विलक्षण आहे. सर्वांनाच 3 वर्षांची किंवा 1918 दिवसांची पायी परिक्रमा करता येत नाही.18 दिवसांची बसने परिक्रमा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात करता येणे अनेकांना अवघड असते. अशा सर्वांसाठी 3 दिवसांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही एक अतिशय आनंदाची पर्वणी आहे. तीन दिवस नर्मदेच्या सानिध्यात राहून नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेता येतो. तसेच नर्मदापूजन, कन्यापूजन, कढई आणि भंडारा करता येतो. संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळते.
वेळापत्रक
23 डिसेंबर ते 25 डिसेंबर -2018
02 जानेवारी ते 04 जानेवारी-2019
22 फेब्रुवारी ते 24फेब्रुवारी -2019
15 मार्च ते 17 मार्च -2019

Post a Comment

 
Top