Add

Add

0
     दिवाळी अंक प्रदर्शनामुळे दिल्लीकरांना साहित्यिक मेजवानी-
                                                             लेखिका लक्ष्मीकमल गेडाम
महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी दिल्ली(प्रतिनिधी):- महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत लेखिका लक्ष्मीकमल गेडाम यांनी येथे मांडले.
श्रीमती गेडाम यांच्या हस्ते आज दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले याप्रंसगी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्रीमती गेडाम यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर , मुक्त पत्रकार निवेदिता खांडेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती गेडाम म्हणाल्या, 1909 पासून महाराष्ट्रात दिवाळी अंक प्रसिध्द होण्याची दीर्घ परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात हे पंरपंरा , संस्कृती हे विषय दिवाळी अंकामधून मांडले जात असत. आता दिवाळी अंकांचा व्याप वाढला असून दरवर्षी जवळपास 900दिवाळी अंक मराठी भाषेत प्रकाशित होतात. शिक्षण, आरोग्य, राजकारण, महिला, बालक, तरूण, चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेली दिवाळी अंक प्रदर्शीत होत असल्याचे आनंददायी चित्र सध्या आहे.महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत हे दिवाळी अंक मराठीजनांना वाचनासाठी मिळत असल्याचा अत्यानंद होत असून हे प्रदर्शन म्हणजे दिल्लीकरांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रदर्शनात 100 दिवाळी अंकांची मेजवानी...
या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्रटाईम्स, लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी आदी 100दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक12 डिसेंबर 2018 पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Post a Comment

 
Top