Add

Add

0
      रस्ता एकाच वेळी दोन्ही बाजूला उकारल्याने हा रस्ता धोकादायक 
पौड(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यात जालना ते दिघी बंदर या राज्य महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.माञ धनवेवाडी ते पौड दरम्यान असलेला रस्ता एकाच वेळी दोन्ही बाजूला उकारल्याने हा रस्ता धोका दायक झाला असून येथील खड्ड्यात एक टि 20 हि चारचाकी समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या नादात खड्ड्यात पडली. सुदैवाने वाहनात चालक एकटाच असल्याने यात कोणतीही हनी झालेली नाही.
      सध्या चांदणी चौक ते ताम्हिणी घाट या राज्य महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी केंद्र शासनाकडून 500 कोटी रूपयांचा निधीही मंजूर झालेला आहे. काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी चार पदरी हा रस्ता होणार आहे. या होणाऱ्या रस्त्याचे काम धनवेवाडी ते पौड दरम्यान युध्दपातळीवर सुरू आहे. माञ येथे होणाऱ्या रस्त्यासाठी ठेकेदाराने एकाचवेळी रस्ता दोन्ही बाजूला उकारलेला आहे. यामुळे एका बाजूला हा रस्ता खोल झालेला असून धोकादायक झालेला आहे. दोन्ही बाजूला रस्ता उकारल्याने मुख्य रस्ता कमी झालेला आहे. येथील रोड सरळ आणि उताराचा असल्याने येथे गाड्याचा वेग जास्त असतो.त्यामुळे येथे उपाययोजना केली नाहीतर पुन्हा मोठा अपघात घडू शकतो.
       चांदणी चौक ते ताम्हिणी घाट दरम्यान मुळशी तालुक्यात रस्त्याचे काम सध्या सुरू असून हा रस्ता अनेक ठिकाणी उकारण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी मोय्रा टाकण्याचेही काम सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उकारण्यात येत असून जेसीबी कधीही मुख्य रस्त्यावर येतात.यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावावेत तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूकही करावी जेणेकरून कुठलाही  अपघात या रस्त्यावर होणार नाही अशी माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन पळसकर आणि विभागप्रमुख विश्वनाथ वीर यांनी दिली.
फोटोओळ : धनवेवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावेळी खड्ड्यात पडलेले चारचाकी वाहन.
छाया : दिपक सोनवणे.
       

Post a Comment

 
Top