Add

Add

0

अपसाऊथ मध्ये आता पौष्टिक डोसे मिळणार..चीट दिवसांना बसणार आळा
जोडीला विविध प्रकारच्या चटकदार चटण्या...

पुणे(प्रतिनिधी ):- डाएट करत असताना एखादा चीट डे केला जातो. पण अशा चीट डे च्या दिवशीच कमी उष्मांकाचं जेवण तुम्हांला मिळालं तर? बसला ना धक्का? मग आता अपसाऊथच्या आउटलेट्स मध्ये असलेल्या स्वादिष्ट पण पौष्टिक अशा नव्या,बहारदार डोश्यांचा आस्वाद घेऊन बघा.जोडीला,तुमच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या विविध प्रकारच्या चटण्या चाखून बघा.
 या डोश्यांमध्ये ग्रीन ग्राम पेसारट्टू (हिरव्या हरभरा पीठापासून बनवलेला), मल्टीग्रेन डोसा (8 वेगवेगळ्या धान्य आणि डाळींपासून बनलेला) आणि रागी डोसा (ज्वारी-बाजरी पासून बनवलेला) यांचा समावेश आहे. घरी बनवलेल्या आरोग्यपूर्ण साजूक तुपापासून बनवलेले हे डोसे चांगले चीट मील असून खूप जास्त कॅलरीज म्हणजेच उष्मांक वाढण्याचा धोकाही नाही. 
त्यांच्या जोडीला अपसाऊथ मध्ये स्वादिष्ट चटण्याही असणार आहेत. चटणीशिवाय डोश्याची कल्पना तरी शक्य आहे का? चटण्यांमध्ये लाल चटकदार चटणी (खोबऱ्यात गुंटूर मिरच्या, बाडगी मिरच्या आणि घाटी मिरच्या घालून केलेली चटणी), कढीपत्ता चटणी (हाताने कुटलेल्या मसाल्यांसह कढीपत्त्याची चटणी), चटपटीत गोड चिंचेची चटणी (चटकदार, गोड आणि आंबट यांचे मिश्रण) आणि अपसाऊथ विशेष खोबरं चटणी (फोडणी सह असलेली खोबरा चटणी) यांचा समावेश आहे. 
मग आता वाट कशाची बघत आहात?
अपसाऊथच्या पौष्टिक डोश्यांच्या मदतीने चीट डेजलाच आता चीट करा, फसवा!
काय: अपसाऊथचे पौष्टिक डोसे
कुठे?: अपसाऊथच्या सगळ्या आउटलेट्स मध्ये.
कधी: दररोज

Post a Comment

 
Top