Add

Add

0
महाराष्ट्र शासनाचे फुले चरित्र साधने समितीवर रघुनाथ ढोक यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासना तर्फे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वर सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीचे अध्यक्ष मा.विनोद तावडे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच उपादयक्ष म्हणून राज्यमंत्री रविंद्र
वायकर  हे काम पाहणार आहेत.
ढोक हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,पुणे महानगर पश्चिम चे अध्यक्ष,फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ,पुणे विद्यार्थी गृह सेवकांची पतसंस्था मर्यादित पुणे चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस,मुद्रण महर्षी डॉ.प.भ.कुलकर्णी प्रतिष्ठान चे सचिव,ह्यूमन राइट्स अ.ऑफ इंडिया चे महाराष्ट्र edu. सचिव, दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शांतता कमिटी सदस्य हुजूरपागा गर्ल्स सोसा. आजीव सदस्य तसेच अनेक शैक्षणिक,सहकार,सामाजिक,संस्थेवर पदाधि कारी म्हणून कार्यरत आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी अनेक जाती धर्माचे विवाह जुळवून स्वतः महात्मा फुले याचे वेशभूषेत सत्यशोधक पद्धतीने विवाह देखील लावले व  नियमितपणे लावीत असतात.सर्व जाती धर्मातील गरीब गरजू प्रथम,विधवा विधुर व इतर वधु वरांचे मोफत विवाह लावणेसाठी देखील सर्व सुविधाने बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राची निर्मीती वावरहिरे, सातारा येथे केली आहे.ते लवकरच या केंद्रामध्ये सामाजिक न्यायाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतिचे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले ,भारतीय स्त्री शिक्षणाच्या आध्येप्रनेत्या सत्यशोधक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळा बसविणार आहेत.या पूर्वी नुकतेच हरियाणा ,कुरुक्षेत्र येथील -सावित्री - ज्योतीबा फुले ग्रंथालयास महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे भेट दिले आहेत.त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जीवनचरित्र 4रंगी  मराठी,हिंदी,इंग्रजी आणि जर्मन भाषेत व दीनांची साउली पुस्तक व इतर साहित्य प्रकाशित केले आहे. त्यांचे  सामाजिक कार्य महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर चालू  असल्याने  महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती वर महाराष्ट्र शासनाने निवड केल्याने त्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

 
Top