Add

Add

0

                   ...

             

मुंबई (प्रतिनिधी ):-"कॅलेंडर" च्या माध्यमातून नवनवीन विषय साकारायला मिळतात , वेगळं असा काहीतरी चाचपण्याची संधी मिळते.. म्हणून ह्या वर्षी सुद्धा एका "कॅलेंडर"च्या रूपात छायाचित्रांचा एक छोटा संच आणला आहे.सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते या छाया चित्रकार तेजस नेरुरकरच्या "वंदे मातरम् 2019" कॅलेंडरचे लाँच करण्यात आले. याप्रसंगी अविनाश गोवारीकर ह्यांनी तेजसच्या या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या."वंदे मातरम्" या गीताने गायिका सायली पंकजने या कार्यक्रमाची सुरुवात केली.
 
ह्या देशात आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो, स्वतंत्र राहू शकतो, त्या देशाचा प्रत्येक कोपरानकोपरा हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला परत मिळाला आहे. त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच. पण त्यांची आठवण मनाच्याही अंतर्मनात कुठल्याना कुठल्याही रूपात पक्की असावी ह्या धारणेतून कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात आली. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असे दिवस सोडल्यास त्या हुतात्म्यांची आठवण क्वचितच होते, अथवा होते का ? हा मी मलाच विचारलेला प्रश्न! ह्याच प्रश्नाला उत्तर म्हणून, त्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून ह्या वर्षीच म्हणजेच 2019 चे कॅलेंडर "वंदे मातरम् -2019".
मराठी सिनेसृष्टीतील जवळपास 26शरद केळकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, प्रवीण तरडे, सुनिल बर्वे, सागर देशमुख, डॉ अमोल कोल्हे, आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, अमेय वाघ, ललित प्रभाकर, अक्षय टांकसाळे, सोनाली कुलकर्णी (jr ), प्रिया बापट, श्रिया पिळगावकर, प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, नेहा महाजन, प्रियांका बर्वे, पूजा सावंत, उर्मिला कानिटकर, श्रेया बुगडे, ऋता दुर्गुळे, तेजश्री प्रधान, स्पृहा जोशी या सर्व कलाकारांचं स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेत फोटोशूट केलं. माझ्या छोट्याश्या विनंतीला मान देऊन सर्व जण वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
कलाकारांचा सहभाग यंदाच्या या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top