Add

Add

0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे‘21 व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार!’ या विषयावर विश्‍वराजबाग, पुणे येथे
॥ 3 दिवसीय ज्ञान-जागर ॥

पुणे(प्रतिनिधी ):-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणेतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकांनंद यांच्या १५६ व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार, दि. 10 ते शनिवार दि.12 जानेवारी 2019 या कालावधीत ‘21व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरू’ होणार!’ या स्वामीजींच्या सन 1897च्या वचनांवर आधारित,‘ज्ञानजागर’हा आगळा-वेगळा कार्यक्रम,विश्‍वराजबाग,लोणीकाळभोर,पुणे येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती सभागृह आणि विश्‍व शांती ग्रंथालयात आयोजित करण्यात आला आहे. 
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी १८९७ साली असे भाकीत केले होते, की ‘21 व्या शतकात माझी भारतमाता जगात ‘ज्ञानाचे दालन’ म्हणून उदयास येईल व विश्‍वगुरु म्हणून तिची जगासमोर ओळख निर्माण होईल’.त्यांच्या या वचनावर आधारित एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठातर्फे ‘21व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार! या विषयावर तीन दिवसीय ‘ज्ञानजागरा’चे आयोजन केले आहे.  
आपल्या भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे वर्णन करताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानी येते,ती म्हणजे हजारो वर्षापासून या आपल्या मातृभूमीमध्ये मुख्यत्वे दोन गोष्टींची पूजा केली गेली. त्यातील पहिली ‘ज्ञानाची पूजा’ आणि दुसरी ‘सत्याची पूजा’. संपूर्ण विश्‍वामध्ये ज्ञान हेच एकमेव सत्य! या विश्‍वाचे एक अंतिम चैतन्यस्वरूप हे सुध्दा ज्ञानस्वरूपच होय!  संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या खालील उक्तीनुसार याची प्रचिती येते..
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्व संवेद्या ।  आत्मरूपा ॥
या पार्श्‍वभूमीवर एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाने पहिल्यांदाच विश्‍वात्मक चैतन्यस्वरूप ‘ज्ञान’ या विषयावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने आणि कीर्तन / प्रवचने आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये गुरुवार,दि10 जानेवारी 2019 रोजी दु. 3.30 वा. संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ, परम संगणकाचे जनक डॉ.विजय भटकर यांच्या शुभहस्ते या ज्ञानजागरचे उद्घाटन होणार असून डॉ.विजय भटकर आणि ‘ज्ञानेश्‍वरी’ग्रंथाचा ओवीबध्द इंग्रजी अनुवार करणार्‍या स्वामी राधिकानंद सरस्वती यांचे ‘ज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.त्यानंतर संध्या. 5.30 वा. सुप्रसिद्ध गायक डॉ. महेश काळे हे ज्ञानस्वरूप भक्ती-संगीत कीर्तन सादर करतील.

शुक्रवार, दि.11 जानेवारी 2019 रोजी हिमालयस्थित गुरू श्री.योगी अमरनाथजी व विज्ञानवादी वैदिक अभ्यासक श्री. प्रविण राजपाल यांची ‘ज्ञान’ विषयावर व्याख्यानं होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.15 वा. औसा संस्थानचे प्रमुख ह.भ.प. श्री. गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भजन/कीर्तन होणार आहे.

शनिवार, दि.12 जानेवारी 2019 रोजी, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, संतस्वरूप व ज्ञानस्वरूप विभूती उडुपी,कर्नाटक येथील पेजावर मठाचे ज्ञानमठाधिपती प.पू. आदरणीय श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजींना शैक्षणिक, सामाजिक,आध्यात्मिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आणि विश्‍वशांती व विश्‍वकल्याणाच्या कार्याबद्दल, ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्म ऋषी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. विजय पां. भटकर आणि शांतिब्रह्म ह.भ.प. श्री. मारूती महाराज कुर्‍हेकर यांच्या शुभहस्ते आदरपूर्वक अर्पण करण्यात येईल. 
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष  प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड आणि जगप्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय पां. भटकर यांनी दिली. 

Post a Comment

 
Top