Add

Add

0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे
पेजावरमठाचे मठाधिपती प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांना
‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार जाहीर
पुणे(प्रतिनिधी ):- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे कर्नाटकमधील उडुपी येथील पेजावर मठाचे ज्ञानमठाधिपती प.पू.श्री श्री  विश्‍वेशतीर्थ स्वामी यांना आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकांनंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दि.12 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11.15 वाजता विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली विश्‍व शांती प्रार्थना सभागृहात हा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
या समारंभासाठी संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यात्माचे अभ्यासक व कीर्तनकार शांतीब्रह्म ह.भ.प.श्री मारुती महा राज कुर्‍हेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प.पू. स्वामी श्री विश्‍वेशतीर्थ हे उड्डपी (कर्नाटक) येथील पेजावर मठाचे 32 वे प्रमुख स्वामी असून विश्‍व  तुळू संमेलनाचे मानद अध्यक्ष आणि पूर्णप्राज्ञ विद्यापीठाचे संस्थापक आहेत. हिंदू धर्माचे  गाढे अभ्यासक आणि एक महान तत्त्वचिंतक असलेले स्वामी विश्‍वेशतीर्थ हे भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, संतस्वरूप व ज्ञानस्वरूप विभूती म्हणून त्यांची ओळख आहे. विश्‍वशांती व विश्‍वकल्याणाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले आहे.
स्वामींजींनी सुरू केलेल्या अखिल भारत मध्य महामंडळ एबीएमएम सेंटरने गरीब विद्यार्थ्यांना मदत केली आहे. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी कर्नाटमधील बेंगळुरू, हुबळी, धारवाड अशा ठिकाणी वसतीगृहे सुरू केली आहेत. त्यांना राष्ट्रसेवक म्हणून ओळखले जाते. ते एक महान समाजसुधारक आहेत.
 प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली. 

Post a Comment

 
Top