Add

Add

0
          ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन...
                                भावपूर्ण श्रद्धांजली 

   मी कायम समाधानी आणि तृप्त... किशोर प्रधान

माझी लायकी नसतानाही देवाने मला खूप भरभरून दिलं. त्यामुळे रंगभूमी सेवा पुरस्कार स्वीकारताना देव आणि रसिकांपुढे मी नतमस्तक आहे. सगळ्यांप्रति मला कृतज्ञता वाटत आहे. मराठी रंगभूमीला दीडशे ते पावणेदोनशे वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. एवढी वर्षे ही नाटके बघून प्रेक्षक अतिशय प्रगल्भ झाला आहे. आज प्रेक्षकांना नाटक फार पटकन कळतं. नाटकातील बारीकसारीक पैलूंवरही ते विचार करतात. त्यामुळे खऱया अर्थाने रंगभूमीचा हा एक मोठा वारसा आहे.

मराठी आणि इंग्रजी नाटकात काम केल्यामुळे मी दोन्ही बाजूने संपन्न झालो. नाटक, सिनेमा यातला माझा व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभवही उत्तम आहे. मराठी नाटकांनी व्यासपीठावर काम करण्याचं बळ मिळवून दिलं. इंग्रजी नाटकांनी मला असा प्रेक्षक मिळवून दिला, जो मी कधीही पाहिलाच नव्हता. एक वेगळ्याच प्रकारचे रसिक प्रेक्षक मला मिळाले. इथे काहीतरी वेगळं करण्याची, आजमावण्याची संधी मिळाली. लोकांचीही मला उत्तम दाद मिळाली. जे कराल ते थोडं आणि ध्येय बाळगून करा. 

इंग्रजी रंगभूमीवर आम्ही मराठीमधली वैशिष्टय़पूर्ण नाटके इंग्रजीमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला. पुरुष, तुज आहे तुजपाशी इत्यादी काही उत्तमोत्तम आणि गाजलेली नाटके ती इंग्रजीमध्ये त्यात कोणताही बदल न करता जशीच्या तशी सादर केली. 'तुज आहे तुजपाशी'मधला वासुअण्णा आम्ही धोतर नेसलेल्या वेशभूषेत, पोटाचा घेरा ठेवून, त्याची बोलण्याची लकब यामध्ये कोणताही फरक न करता इंग्रजीमध्ये सादर केली. माझ्या अशा नाटकांनाही रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. इंग्रजी प्रेक्षकांनाही अशी मराठी मातीतली नाटकं हवी आहेत. तमाशावर आधारितही एक नाटक केलं. त्यामध्ये राजा, प्रधान असं तमाशाशी निगडित नाटक इंग्रजी प्रेक्षकांनी कधी पाहिलेलंच नाही. म्हणून  मराठीतली उत्तम नाटकं इंग्रजी प्रेक्षकांसाठी व्हायला हवीत. 

'तुज आहे तुजपाशी' हे नाटक आम्ही इंग्रजीमध्ये सादर केलं. त्यामध्ये दिलीप प्रभावळकर, लीना कुलकर्णी, आत्माराम भेंडे असे बरेच मराठी कलाकार होते. या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही हाँगकाँगला केला. एका जबरदस्त मोठय़ा टोलेजंग नाटय़गृहात हा प्रयोग सादर झाला. आमच्या प्रयोगालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रेक्षकांनी 3-4 मिनिटे उभे राहून टाळ्यांची दाद मिळाली. दुसऱया दिवशी आम्ही खरेदीकरिता बाहेर गेल्यावर आम्हाला लोकांनी ओळखून त्यांनी आम्हाला मराठी मातीतली नाटकं इंग्रजीत हवीत, असं सांगितलं. मराठी नाटकाचा मेवा तुम्ही इंग्रजीत दिलात यासाठी त्यांनी आमचे आभार मानले.
संकलन : अक्षरवाटा

Post a Comment

 
Top