Add

Add

0
     पारधी समाजाच्या लक्षणीय उपस्थितीत... पारधी समाजातील                    जळजळीत सत्य समाजासमोर आणणारा "पारधाड सिनेमा

 पुणे (स्नेहा निवटे ):-ज्ञानविजय फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ज्ञानेश्वर कुंडलिक भोसलेदिग्दर्शित 'पारधाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पारधी समाजातीळ लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत 'पारधाड' या सिनेमाचा नुकताचपोस्टर ट्रेलर लॉंच सोहळा पुण्यात झाला. फासे पारधी समाजाचे वास्तव आणिदाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. अन्न,वस्त्र, निवारा आणिशिक्षण या मूलभूत गरजांपाससून भटक्या आणि विमुक्त जाती कशा प्रकारे वंचितआहेत याचं नेमकं चित्रण सिनेमात दाखविण्यात आलं आहे. दिग्दर्शकज्ञानेश्वर भोसले यांचे 'चौदा महिने तेरा दिवस' आत्मचरित्र या सिनेमाचाआत्मा आहे असे म्हटल्यास वावगं ठरू नये. पारधाड सिनेमाची कथा, निर्मितीआणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 
याप्रसंगी मा.मेघराजराजे भोसले(अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), गिरीशप्रभुणे (सामा जिक कार्यकर्ता), भिकूजी तथा दादा इदाते (पारधी आयोग भारतसरकार), विजया भोसले व्यवस्थापिका (भारत माता आदिवासी पारधी विध्यार्थीवसतिगृह मोहोळ-सोलापूर),मीरा ताई फडणीस (स्वामी विवेकांनद आदिवासीछात्रवास यवतमाळ) आणि  राजश्री काळे नगरसेविका (पुणे महानगरपालिका) तसेचसिनेमातील मुख्य कलाकार मंडळी पुण्यातील मंगला थिएटरमध्ये उपस्थितीतहोती. फासे पारधी समाजातील होतकरू तरुण ज्ञानेश्वर त्याच्या समाजालाकिमान माणसात आणण्यासाठी करत असलेली धडपड पाहता आजच्या आधुनिक आणिझपाट्याने वाढणाऱ्या शहरात अशी देखील माणसं जगत आहेत याचे नवल आहे.
गुन्हेगारीचा कलंक माथी घेऊन वर्षानुवर्षे रूढी परंपरेच्या ओझ्याखालीजगणाऱ्या समाजाला नवी दिशा देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाबाबतदिग्दर्शक ज्ञानेश्वर म्हणतात, 'गुन्हेगार' ही ओळख वगळता या समाजातील
लोकांना कोणत्याही प्रकारचे ओळख प्रमाणपत्र नाही. समाजाकडून, पोलिसांकडूनअवहेलना आणि अत्याचार पाचवीला पुजलेला जो माझ्या कादंबरीत मावणार नाही.
त्याची झळ आणि सत्यता सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंतपोहोचावी या उद्देशातून पारधाड सिनेमाची निर्मिती केली. या सगळ्यात  माझीपत्नी आणि बहिणीने केलेला त्याग आणि बलिदान शब्दात मांडू शकत नाही जोसिनेमात पाहिल्यावरच लक्षात येईल. या सिनेमाची पटकथा, संवाद जहिरुद्दीन पठाण यांचे असून छायांकन ए. रेहमान शेख, तांत्रिक दिग्दर्शक अमर पारखे,कार्यकारी निर्माता मयूर रोहम, कला दिग्दर्शन सुहास पांचाळ, निर्मितीनियंत्रक अनुप काळे, संगीत-पार्श्वसंगीत प्रजापती भिसे,गीतकार सिकंदरमुजावर, गायक नंदेश उमप, साजन बेंद्रे, अंजली प्रजापती यांनी सिनेमातीलगाणी गायली आहे.  अभिनेता धनंजय मांद्रेकर, संदेश जाधव, चेतना भट,कीर्तीचौधरी,मनोज टाकणे,दीपक चव्हाण,शीतल कलापुरे, सोनल आजगावक, निशा काळेआणि प्रदीप कोथमिरे या नव्या चेहऱ्यांची कलाकार मंडळी सिनेमात दिसणारआहे. येत्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारा पारधाड सिनेमामहाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालेल अशी आशा आहे.

Post a Comment

 
Top