Add

Add

0
खेलोत्सव प्रदर्शनात लोकराज्यच्या स्टॉलचे क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


पुणे (प्रतिनिधी):-महाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असणाऱ्या खेलो इंडिया 2019 स्पर्धे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या खेलोत्सव प्रदर्शनातील लोकराज्यच्या स्टॉलचे उद्घाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते  झाले.

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या जानेवारीचा अंक ‘खेलो इंडिया’ विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. या विशेषांकाचे खेलो इंडीया स्पर्धेच्या उद्घाटनावेळी त्याच मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड, पालकमंत्री गिरीश बापट, क्रीडामंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाचे अतिथी संपादक क्रीडामंत्री विनोद तावडे हे आहेत.

‘लोकराज्य’ सेल्फी पॉईंटवर क्रीडा मंत्र्यांची सेल्फी...
खेलोत्सवात लावण्यात आलेल्या लोकराज्यच्या स्टॉलच्या समोरच लोकराज्यचा सेल्फी पॉईंट लावण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटचे कौतुक करून क्रीडामंत्री श्री.तावडे यांनी सेल्फी घेतली. खेलोत्सवाच्या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या ‘लोकराज्य’च्या स्टॉलला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्टॉलला भेट देणारे आवर्जुन या लोकराज्य सेल्फी पॉईंटवर जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.

खेलोत्सवात दुमदुमला ‘लोकराज्य’चा आवाज...
या खेलोत्सवाच्या ठिकाणी येणाऱ्या मुलांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेल्या मंचावरुन निवेदन करणाऱ्या निवेदिका वंदना वडेरा यांनी लोकराज्यची माहिती आपल्या अनोख्या अंदाजात दिली. जानेवारीच्या खेलो इंडिया विशेषांकाची धावती माहिती त्यांनी यावेळी दिली. या निवेदनामुळे खेलोत्सवात खऱ्या अर्थाने ‘लोकराज्य’चाच आवाज दुमदुमला.

‘लोकराज्य’त भेटले मुलांना त्यांचे आयडॉल...
जानेवारीचा लोकराज्यचा अंक खेलो इंडियावर विशेषांक म्हणून काढण्यात आल्याने या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकराज्य विषयी विशेष आकर्षण आहे. या अंकाच्या माध्यमातून त्यांना ऑलंपिक वेजेत्या खाशाबा जाधवांपासून आजच्या तरुणाईचे आयडॉल असणारे राही सरनोबत, कविता बाबर, विजय चौधरी, अंजली भागवत यांची भेट होत होती. त्यामुळे अनेक मुलांनी या लोकराज्यच्या अंकांचे सामूहिक वाचन या ठिकाणी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Post a Comment

 
Top