Add

Add

0
पौड पोलीस स्टेशनचा आगळा वेगळा "मुळशी पॅटर्न "
पौड (प्रतिनिधी ):-"मुळशी पँटर्न"या चिञपटामुळे मुळशी तालु क्यातील गुन्हेगारीची चर्चा सर्व देशभरात झाली.माञ पौडचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गेल्या दोन वर्षात राबवि लेल्या पोलिस पँटर्न मुळे तालुक्यात कोणत्याही प्रकारचे गँगवार तसेच कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी घटना घडली नाही.तसेच राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत पोलिसांचे कौतुकही केले.
  प्रतिबंधक कारवाई :-
 गेल्या दोन वर्षात मुळशी तालुक्यात 2 मोक्का, 3 एमपीडी, 733 इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली तर अनेक जणांनावर तडीपारी ची कारवाई करण्यात आलेली आहे.हत्या होण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा 40 टक्क्यांनी घट झालेली आहे तर पूर्वी न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 16 टक्के होते ते आता 55 टक्के झाले आहे.
 अवैध धंद्यावर धडक कारवाई :-
 तालुक्यात असलेल्या अवैध धंद्यावर गैल्या दोन वर्षात धडक कारवाई करण्यात आली.यात सन 2017 मध्ये 87 गुन्हे दाखल करून 6,31,168रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सन 2018 मध्ये 127 गुन्हे दाखल करून 14,91,801रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध धंदा करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
  सन, उत्सव, निवडणुका शांततेत : मनुष्यबळ कमी असतानाही तालुक्यात सर्व सण तसेच झालेल्या सर्व निवडणूका कायदा व सुव्यवस्थेचा भंग न होता पार पडल्या.
 आंदोलने :-
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने झाली याची धग मुळशी तालुक्यातही जाणवली तसेच स्थानिक पातळी वरही काही आंदोलने करण्यात आली.माञ पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे ती हातळण्यात पोलिसांना यश आले.
  पर्यटन व वाहतूक नियोजन :-
 मुळशी तालुका हा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो.पावसाळ्यात मुळशीत अनेक पर्यटक येत अस तात. तालुक्यातील रस्ते बारीक व खराब असूनही आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी पोलिसांनी घेतली.
   तक्रार निवारण दिन :-
 दर शनिवारी पौड पोलिस स्टेशनमध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते.कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलिस महा निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एका तक्रार निवारण दिनाला हजर राहून चाललेल्या कामाला आणि नागरिकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाचे कौतुक केले होते.
  स्त्री विषयक धोरण :-
तालुक्यात महिलांचे संरक्षण व्हावे म्हणून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली असून शाळा व काँलेजवर विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी "विद्यार्थी सुरक्षा समिती"स्थापन करण्यात आलेली असू "तक्रार निवारण पेटी" बसविण्यात आलेली आहे.अनेक ठिकाणी पालक व विद्यार्थी यांना समोर बसवून समुपदेशन बैठक घेण्यात आलेली आहे तर महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून बसस्थानक परिसरातफिरणाय्रा रोडरोमिओवरही कारवाई करण्यात आलेली आहे.
    प्रभावी प्रतिबंधक कारवाई, व्यापक जनसंपर्क,पोलिस पाटील,ग्रामसुरक्षा दल, महिला दक्षता समिती, महिला सुरक्षा समिती, पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून तसेच पोलिस अधिक्षक संदिप पाटील,अपर पोलिस अधिक्षक संदिप जाधव,पुर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलकाळात "गुन्हेगारीमुक्त तसेच शांततामय मुळशी पँटर्न" तयार करू असे पौडचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, महेश मोहिते,अनिरूध्द गिजे, रेखा दूधभाते उपस्थित होते.

Post a Comment

 
Top